![]()
लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका महिलेवर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याची संतापजनक घटना पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. नसरापूर बलात्कार व हत्या प्रकरणातील वेदना कायम असताना ही घटना घडल्यामुळे पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. पीडित महिला व आरोपी पुरुषाची रात्री कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिद्ध हॉटेलमधील पार्टीत ओळख झाली होती. त्यानंतर आरोपीने पीडितेला घरी सोडतो म्हणून कारमध्ये बसवले. त्यानंतर धावत्या कारमध्येच तिच्यावर बलात्कार केला. प्राथमिक तपासात महिलेवर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्कसारख्या शहरातील वर्दळीच्या भागात ही घटना घडल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या घटनेतील गांभिर्य ओळखून तपास सुरू केला आहे. विशेषतः या प्रकरणी पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपीचा शोध सुरू केला आहे. येवलेवाडीत 9 वर्षीय मुलीचा बलात्कार दुसरीकडे, पुण्यातील येवलेवाडी परिसरातही एका 9 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचीही संतापजनक घटना उजेडात आली आहे. धनराज बालाटी (38) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी पीडित मुलीचा नात्याने चुलत आजोबा लागतो. घरात कुणीही नसल्याची संधी साधत आरोपीने आपल्या 9 वर्षीय नातीवर हात टाकला. पीडित मुलीचे कुटुंब हे उदरनिर्वाहासाठी नेपाळहून पुण्याला आले आहे. तिचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. आरोपी पीडित कुटुंबीच्या शेजारीच राहत होता. त्याने मुलीच्या घरी व शेजारी कुणीही नसल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. हे ही वाचा… एम. सरांची कुंडली!:मोटेगावकरांकडे 10 दिवसआधीच होता NEET पेपर; 10 विद्यार्थ्यांसह सुरू केलेल्या RCC क्लासेसचे सध्या 40 हजार विद्यार्थी, कोट्यवधींची माया, वाचा सविस्तर
देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूरचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ शिवराज मोटेगावकर यांचे नाव चर्चेत आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाच्या तपासात रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात RCC या नामांकित कोचिंग संस्थेची चौकशी सुरू केली असून, संस्थेचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांची अनेक तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमधील शिक्षण क्षेत्रात मोठा दबदबा असलेल्या RCC क्लासेसवर CBI ने धाड टाकत संगणक, लॅपटॉप, आयपॅडसह अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केली. त्यामुळे राज्यातील कोचिंग विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर
Source link