![]()
ऊर्जा क्षेत्रात देशाला स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आज एक मोठे पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात महाराष्ट्र शासन आणि देशातील दिग्गज कंपन्यांमध्ये अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी तब्बल ४.५ लाख
.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नेट झिरो’ (शून्य कार्बन उत्सर्जन) मोहिमेत महाराष्ट्र आता देशाचे इंजिन ठरणार आहे. राज्याला आणि देशाला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्यासाठी राज्य सरकारने आज अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात एक मोठी झेप घेतली. स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकत राज्य शासनाने NTPC, अदानी पॉवर, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ललितपुर पॉवर (बजाज समूह) यांच्याशी करार केले आहेत. या प्रकल्पांतून एकूण २५,४०० मेगावॅट इतकी अवाढव्य वीजनिर्मिती अपेक्षित आहे.
महाराष्ट्र स्वच्छ ऊर्जेत देशाला दिशा देईल – मुख्यमंत्री
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान मोदींचे भारताला संपन्न ऊर्जा राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध आहे. अणुऊर्जा ही केवळ वीजनिर्मितीचे साधन नसून ती पर्यावरणाच्या रक्षणासाठीही काळाची गरज आहे. या गुंतवणुकीमुळे राज्याचा विकास वेग घेईल आणि तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी सरकार कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल.”
वेळ न घालवता कामाला लागा!
मुख्यमंत्र्यांनी संबंधित कंपन्यांना प्रकल्पाच्या जागांचे सर्वेक्षण वेगाने सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कामात ऊर्जा विभाग संपूर्ण तांत्रिक आणि प्रशासकीय मदत करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. बैठकीत ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला आणि कंपन्यांच्या प्रतिनिधींनी करारांचे आदान-प्रदान केले.
गुंतवणूक आणि रोजगाराची माहिती खालीलप्रमाणे:
| कंपनीचे नाव | गुंतवणूक (कोटी ₹) | ऊर्जा निर्मिती (मेगावॅट) | अपेक्षित रोजगार |
| रिलायन्स इंडस्ट्रीज | २,००,००० | ७,२०० | १,००,०००+ |
| ललितपुर पॉवर (बजाज) | २,००,००० | ५,००० | ३,००० |
| अदानी पॉवर लिमिटेड | १,५०,००० | ६,००० | १२,००० |
| NTPC लिमिटेड | १,००,००० | ७,२०० | ५,००० |
| एकूण | ६,५०,००० | २५,४०० | १,२३,५०० |