Headlines

चॉकलेटमधून दिली गुंगीची गोळी:अमरावतीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या तरुणाकडून अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल




ओळखीचा गैरफायदा घेऊन एका 25 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे चॉकलेट देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. याप्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाल्या असून, राजापेठ पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून नराधम तरुणाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शंतनू (वय 25, रा. अमरावती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नराधम तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई जून 2024 मध्ये आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होती. त्या वेळी पीडित मुलगी तिच्या आईची काळजी घेण्यासाठी रुग्णालयात थांबली असता, तिची ओळख आरोपी शंतनू याच्याशी झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत शंतनूने जानेवारी 2026 मध्ये पीडित मुलीला फोन करून भेटण्यासाठी बोलावून घेतले. शहरातील एका नामांकित गार्डनमध्ये नेऊन त्याने तिच्यावर पहिल्यांदा बळजबरी केली. बेशुद्ध पडताच झाडाच्या मागे नेऊन केले कृत्य या पहिल्या घटनेनंतर शंतनूने पुन्हा 15 जून 2026 रोजी पीडित मुलीला सायंकाळी त्याच गार्डनमध्ये बोलावले. तिथे गेल्यानंतर त्याने तिला खाण्यासाठी चॉकलेटसारखी एक गोळी दिली. ती गोळी खाताच पीडित मुलीला तीव्र चक्कर आली आणि ती जागीच बेशुद्ध पडली. तिच्या या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन शंतनूने तिला ओढत झाडाच्या मागे नेले आणि तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. फरार आरोपीचा शोध सुरू हा सर्व प्रकार भीतीपोटी पीडितेने कोणालाही सांगितला नव्हता. दरम्यान, 4 जुलै 2026 रोजी पीडित मुलीच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने तिच्या आईने तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी केलेल्या वैद्यकीय तपासणी दरम्यान मुलीसोबत घडलेला हा संपूर्ण भयानक प्रकार उघडकीस आला. या धक्कादायक माहितीनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी थेट राजापेठ पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा नोंदवला असून फरार आरोपी शंतनूच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *