![]()
भारताचे माजी उद्योग आणि पुरवठामंत्री श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याविषयी पुणे महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाने किमान दहा मिनिटे बोलायला हवे, अशी उपरोधिक मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी मंगळवारी केली. या अनपेक्षित आव्हानामुळे मह
.
पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत सभागृह नेते गणेश बिडकर आणि अर्चना पाटील (भाजप) यांनी एक प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावानुसार, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे तैलचित्र महापालिकेत लावावे आणि दरवर्षी त्याला पुष्पहार अर्पण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या प्रस्तावावर अमोल बालवडकर यांनी एक उपसूचना मांडली. या उपसूचनेत त्यांनी म्हटले की, “मुखर्जी हे भारताच्या अखंडतेसाठी बलिदान देणारे, ३७० कलमला सर्वप्रथम विरोध करणारे आणि “एक देश में दो विधान, एक देश में दो निशान, एक देश में दो प्रधान नहीं चलेंगे’ अशी घोषणा देणारे राष्ट्रभक्त होते. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाने दहा मिनिटे बोलायला हवे, जेणेकरून ज्यांना माहिती नाही त्यांना ती मिळेल.”
कोण होते डॉ. मुखर्जी
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी (६ जुलै १९०१ – २३ जून १९५३) हे एक महान भारतीय राजकारणी, शिक्षणतज्ज्ञ, बॅरिस्टर आणि प्रखर राष्ट्रवादी नेते होते. ते आजच्या भारतीय जनता पक्षाचे मूळ स्वरूप असलेल्या भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात डॉ. मुखर्जी यांना उद्योग आणि पुरवठा मंत्री बनवण्यात आले होते.
बोलू शकणार नाही लक्षात आल्यावर भाजपचा गदारोळ
प्रत्यक्ष भाषणाची वेळ आल्यास आपल्याला मुखर्जी यांच्यावर १० मिनिटे बोलता येणार नाही, हे लक्षात आल्यावर सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी विरोधाचे शस्त्र उपसले. बालवडकर यांनी अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी शब्द मागे घेण्याची आणि माफी मागण्याची मागणी सुरू केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण गोंधळात एकाही भाजप नगरसेवकाने पुढे येऊन ‘मी मुखर्जींबद्दल बोलू शकतो’ असे धाडस दाखवले नाही. सत्ताधाऱ्यांना निरुत्तर करून बालवडकर यांनी आपली उपसूचना मागे घेतली.