![]()
बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी मोक्का लावला आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महिनिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मोक्काच्या कारवाईस मंजुरी दिली आहे. १२ आरोपींना मोक्का लावला असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान, या टोळीवर १० वर्षांत ११ गुन्हे दाखल आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेली अनेकवर्षे गर्भलिंग चाचणी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू आहे. पोलिसांची नजर चुकवण्यासाठी ही टोळी हॉस्पिटल, जंगल, शेत, दुर्गम भागात गर्भलिंग चाचणी केली जात होती. वैद्यकीय पथके आणि पोलिसांनी अनेक ठिकाणी कारवाई केली असून आरोपींना अटक केली असली तरी जामिनावर सुटल्यानंतर त्यांच्याकडून गर्भलिंग चाचण्या सुरूच होत्या. दीड महिन्यापूर्वी करवीर पोलिसांनी या टोळीवर कारवाई करून त्यांना बेड्या ठोकल्या. टोळीप्रमुख स्वप्निल केरबा पाटील (३५ ), महेश सुबराव पाटील (३५), श्रीमंत तानाजी पाटील यांच्यासह इतरांचा यात समावेश आहे.
Source link
कोल्हापुरात अवैध गर्भलिंग चाचणी; टोळीला मोक्का:दहा वर्षांत टोळीवर तब्बल 11 गुन्हे दाखल