Headlines

लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटला पंधरा दिवसांत 1 लाख 58 हजार क्विंटलची आवक, मागील आठवड्यापासून चार हजारांहून कांद्याच्या भावात वाढ




लासूर स्टेशन मराठवाड्यातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटला दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी मोठ्या प्रमाणात आवक वाढली. चांगल्या कांद्याला ४७४५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला तर सरासरी चार हजार गोलटी कांदा दोन हजाराने विकला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव संतोष पवार यांनी दिली आहे. दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच रविवारी बँकेला सुट्टी असल्याने येथील कांदा मार्केटदेखील बंद ठेवण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. १ ते २४ ऑगस्ट २०२६ दरम्यान येथील कांदा मार्केटला तब्बल १ लाख ५८ हजार २०६ क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे मंडी विश्लेषक संतोष दिवेकर यांनी दिली आहे. सध्या आठवडी बाजारातदेखील चांगल्या कांद्याचे भाव चाळीस रुपये किलो आहेत. विशेष म्हणजे येथील संपूर्ण कांदा मार्केटमधील सक्रिय ४० कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांचा कांदा उघड लिलावद्वारे खरेदी केला जातो. महिन्याभरापासून संचालक बोर्डाने घेतलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू असल्याने कांद्याची पट्टी झाल्याबरोबर शेतकऱ्यांना रोखीने पैसे दिले जातात, अशी खात्री सभापती शेषरावनाना जाधव यांनी दिव्य मराठीकडे दिली आहे. येथील कांदा मार्केटमध्ये तसे लायसन्सधारक ९३ व्यापारी आहेत. परंतु नियमित लिलावामध्ये कमीजास्त तिसाहून अधिक व्यापारी सहभागी राहतात. शेतकऱ्यांनी आणलेल्या वाहनातील मोकळ्या कांद्याचा व्यापाऱ्याकडून उघड लिलाव करण्यात येतो. त्यानंतर वजन झाल्यावर शेतकऱ्यांना पट्टीचे रोख पैसे दिले जातात. दरम्यान, दररोज येथे जिल्हाभरातून आठशे ते हजार वाहनातून कांद्याची आवक येत असते. सकाळ-दुपार अशा दोन सत्रांत हा लिलाव केला जातो. जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातूनही आवक लासूर स्टेशन येथील कांदा मार्केटला सर्वाधिक आवक गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्याकडून येत असते, त्याचबरोबर पैठण, खुलताबाद, कन्नड, फुलंब्रीसह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव बोलठाण, जातेगाव, मनेगाव, रोहेला, मुंगसापूर, तसेच येवल्याजवळील शेतकरी लासूरला कांदा विक्रीसाठी घेऊन येतात. लासूर स्टेशन येथील मार्केटला शेतकऱ्यांनी आणलेला कांदा. असा आहे कांद्याला भाव यात उन्हाळी कांद्याला जास्तीचा भाव ४७४५ कमी भाव ५०० तर सरासरी ३९५० रुपये क्विंटल भाव मिळाला आहे तसेच मार्केटमध्ये दररोज बाजार भाव शंभर-दोनशे रुपयांनी कमीजास्त होत असतो. परंतु, मागील आठवड्यापासून चार हजारांवर कांद्याच्या भावात वाढ झाली आहे. गेल्या १५ दिवसांत १ लाख ५८ हजार २०६ क्विंटल कांद्याची आवक झाल्याची बाजार समितीत नोंद आहे. शेतकऱ्यांनी प्रतवारी करून कांदा आणावा, भाव मिळेल Ãशेतकऱ्यांनी कांदा विक्रीला आणतांना प्रतवारी करून आणावा, जेणेकरून चांगला भाव मिळेल. खराब कांदा थोडाच असतो. परंतु तो न निवडल्यामुळे चांगल्या कांद्याचा भाव कमी करतो. येथून पुढे कांद्याचे भाव वाढत राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगर्दी करू नये. परतवारी करून कांदा विक्रीसाठी आणावा. -योगेश तायडे, कांदा व्यापारी शेतकऱ्यांनी कांदा विक्रीनंतर पट्टीचे पैसे नगदी घ्यावे Ãकांदा विक्रीनंतर शेतकऱ्यांनी पट्टीचे पैसे नगदी घ्यावे. ज्या व्यापाऱ्यांनी पैसे बाकी ठेवले असतील अशा शेतकऱ्यांनी आमच्या बाजार समिती कार्यालयाकडे पट्टीची झेरॉक्स देऊन कळवावे, अशा व्यापाऱ्यांवर बाजार समितीकडून कडक कारवाई केली जाईल. – शेषराव जाधव , सभापती, लासूर स्टेशन. लिलावामध्ये ४३५५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला लासूरच्या कांदा मार्केटला २१ क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता. उघड लिलावामध्ये ४३५५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. पट्टी झाल्यावर व्यापाऱ्याकडून गोडाऊनला कांदा खाली केल्याबरोबर ९१ हजार २५० नगदी पेमेंट मिळाले. – संतोष लाटे , शेतकरी, सोनखेडा, ता. खुलताबाद.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *