Headlines

नागदला कानबाई उत्सव थाटात साजरा:घरोघरी कानबाई माईची पूजा, ग्रामस्थांनी धरला डीजेच्या तालावर ठेका‎




खान्देशची श्रद्धास्थान असलेल्या कानबाई माईचा उत्सव अत्यंत थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या पहिल्या रविवारी घराघरांत स्थापित झालेल्या कानबाई माईचे सोमवारी आणि डीजे ढोल-ताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले. रविवारी पहाटेपासून ठाकरे पाटील परिवारातील बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी पारंपरिक रितीरिवाजानुसार कानबाई माईच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. सायंकाळी सहा वाजता कानबाई माईची आरती म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला. या वेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. महिलांनी रात्री पारंपरिक कानबाईची अहिराणीतून गाणी म्हटली. ​सोमवारी सकाळी कानबाई माईची मूर्ती सजवलेला देव्हारा घराच्या बाहेर आणून महाआरतीनंतर कानबाई माईची विसर्जन मिरवणूक पाटील वाडा येथून सुरुवात झाली. “कानबाई माता की जय’ कनेर राजा की जय, या अहिराणी घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. रस्त्यावरून जाताना घराघरातून कानबाई माईच्या देव्हाऱ्याची महिला व पुरुष मनोभावे पूजा करीत होते. डीजेच्या तालावर युवक, युवती यांनी ठेका धरल्याचे दिसले. फुगड्या पावली खेळून मिरवणुकीचा आनंद घेत होते. गडदगड नदीच्या पात्रात माईला निरोप देण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *