Headlines

किरकोळ वादातून तरुण चढला मोबाइल टॉवरवर:संवाद साधत काढली समजूत‎, सावंगीची घटना




खोलीच्या भाड्यावरून शेजाऱ्यांशी झालेल्या किरकोळ वादातून एका २२ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत मोबाइल टॉवरवर चढून धुमाकूळ घातल्याची घटना मंगळवारी घडली. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या कारवाईमुळे अनर्थ टळला. करण शिवाजी माळी (२२, रा. भिल्लवाडा, सावंगी, ता. छत्रपती संभाजीनगर) असे या तरुणाचे नाव आहे. रूम किरायाच्या कारणावरून गल्लीतील लोकांसोबत वाद झाल्यानंतर करण याने नशेत थेट सावंगी परिसरातील मोबाइल टॉवर गाठले. माहिती मिळताच फुलंब्री पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप नवघरे, नरके व त्यांच्या पथकाने अग्निशमन दलासह घटनास्थळी धाव घेतली. तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर त्याचे मनपरिवर्तन करण्यात यश आले. घटनेची नोंद फुलंब्री ठाण्यात केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *