Headlines

विद्यार्थ्यांची सुरक्षा बसचालकांची जबाबदारी:गणूरच्या होरायझन अकॅडमीत आरटीओ अमोल पवार यांचे आवाहन‎




विद्यार्थ्यांची सुरक्षा ही केवळ प्रशासनाचीच नाही, तर चालक आणि वाहकांचीही नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे शालेय बस चालवताना वेगावर पूर्ण नियंत्रण ठेवावे, ओव्हरटेकिंग टाळावे आणि मोबाईलचा वापर पूर्णपणे बंद करावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य ती खबरदारी घेत वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मालेगावचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अमोल पवार यांनी केले. मविप्र संचलित गणूर येथील होरायझन अकॅडमीमध्ये ‘शालेय वाहतूक सुरक्षेबाबत’ आयोजित विशेष बैठकीत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा आणि पालकांची चिंता मिटावी, या उद्देशाने विद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मंगेश कदम होते. या बैठकीत आरटीओ अमोल पवार यांनी उपस्थित वाहनचालक, वाहक, शिक्षक आणि पालकांना शालेय वाहतुकीचे नियम सविस्तरपणे समजावून सांगितले. वाहनाचे फिटनेस सर्टिफिकेट, विमा, पीयूसी आणि चालकाचा परवाना नेहमी अद्ययावत असणे कायद्यानुसार बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी बसमध्ये चढताना आणि उतरताना अपघात होऊ नये, यासाठी मदतनीसाने दक्ष राहून लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बसमधील अग्निशामक यंत्र आणि प्रथमोपचार पेटीचा वापर कसा करावा, याची सविस्तर माहिती देत आणीबाणीच्या वेळी सतर्कता बाळगण्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्राचार्य मंगेश कदम यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी पवार यांनी दिलेल्या सर्व सूचनांचे शाळा प्रशासनाकडून तंतोतंत पालन केले जाईल, अशी ग्वाही दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *