Headlines

1055 राख्यांतून जवानांना सलाम; पाथर्डीच्या लेकींची देशभक्ती!:‘एक राखी सैनिक के नाम’ उपक्रमातून विद्यार्थिनींच्या हातून प्रेम, कृतज्ञता आणि देशप्रेमाचा धागा‎



रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित श्री विवेकानंद विद्यामंदिरात ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ आणि ‘एक राखी सैनिक के नाम’ हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्र

.

संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून गेल्या १६ वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी विविध रंग, सजावटीचे साहित्य आणि कल्पकतेचा वापर करून राख्या तयार केल्या. भेटकार्डमध्ये काव्यात्मक शब्दांतून देशभक्तीची भावना व जवानांप्रती आदर व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड म्हणाले, “प्रतिकूल परिस्थितीत सीमेवर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थिनींनी राखीच्या धाग्यातून जवानांच्या शौर्याला सलाम केला आहे. सैनिकांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षितपणे जीवन जगत आहोत. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, बंधुभाव, एकात्मता आणि कृतज्ञतेची भावना रुजण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संपत घारे, सोनिका वखरे, स्नेहल बोराडे, मीना तडके, गीतांजली खेडकर, कल्याणी मरळीकर यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्याध्यापक शरद मेढे यांनी केले. ज्ञानेश्वर गायके, रेश्मा सातपुते व अर्चना दराडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *