Headlines

दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाकपची मागणी, प्रशासनास दिले निवेदन‎



येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील (पूर्वीचे डफरीन हॉस्पीटल) नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) लागलेल्या आगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अमरावती महानगर कौन्सिलने य

.

२४ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास नवजात शिशु कक्षामध्ये अचानक आग लागून तीन निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा बालके गंभीर जखमी झाली आहेत. जखमींपैकी एका बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे ही वेळ उद्भवली आहे. त्यामुळे तत्काळ दोषनिश्चिती करुन त्यांना कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यात यावा, असे सदर निवेदनात म्हटले आहे. भाकपच्या निवेदनानुसार रुग्णालयातील वीज जोडणीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पूर्वीच्या जुन्या इमारतीमधून नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये स्त्री रुग्णालय नुकतेच स्थलांतरित करण्यात आले होते. नव्याने उभारलेल्या इमारतीतच एवढी मोठी प्राणघातक दुर्घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यात म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी भाकपचे नेते अशोक सोनारकर, जिल्हा सहसचिव सुनील घटाळे, तालुका सचिव निळकंठ ढोके, बांधकाम कामगार युनियनचे नंदकुमार नेतनराव, हॉकर्स युनियनचे गजानन दरेकर उर्फ भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *