Headlines

महाराष्ट्रात पावसाची उघडीप:नाशिक-जळगावसह पुण्याच्या घाटमाथ्यावर आज यलो अलर्ट




महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आजही पावसाची शक्यता कायम आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासह नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. झारखंड परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्यालगत समुद्रसपाटीपासून सुमारे 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही हवामान प्रणाली पश्चिम आणि वायव्य दिशेने सरकत आहे. त्याचबरोबर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टाही उत्तरेकडे सरकला आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांत अकोला येथे राज्यातील सर्वाधिक 34.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे सर्वात कमी 17.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. राज्यातील काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी सुरू आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली येथे 60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नाशिक, जळगावमध्ये विजांसह पावसाचा इशारा आज पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांसह घाटमाथ्याच्या परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणीही विजांसह पावसाचा अंदाज आहे. नाशिकमध्ये कालही सरींची हजेरी नाशिक शहर आणि परिसरात काल दुपारपासून वेगवान वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात 2.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आज घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाची काही भागांत उघडीप आणि काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.
हेही वाचा.. MPSC ची औषध निरीक्षक परीक्षा अखेर रद्द:पेपर 40 लाखांना विकला, अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, आमदार रोहित पवार आक्रमक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब या संवर्गासाठी घेण्यात आलेली परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, आयोगाने ही परीक्षा रद्द केली असली, तरी फुटलेला पेपर केवळ एकाच विद्यार्थ्याकडे होता हे दिलेले स्पष्टीकरण अजिबात पटण्यासारखे नाही, असा थेट निशाणा पवार यांनी साधला आहे.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *