Headlines

डफरीन फायर स्टेशनमधील ऑटोमॅटिक फायर सेफ्टी यंत्रणा ‘मॅन्युअल’ मोडमध्ये:एसडीओ, तहसीलदारांची पाहणी, समिती आज शहरात‎




जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन) एसएनसीयूमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर डफरीनच्या फायर ऑडिटची मुदत २१ ऑगस्ट रोजी संपल्याचे समोर आले. अमरावतीचे एसडीओ अनिल भटकर आणि तहसिलदार विजय लोखंडे यांना फायर स्टेशन, लिफ्ट आदी ठिकाणांची पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी डफरीनच्या फायर स्टेशनची पाहणी केली. यावेळी एमएस डॉ. विनोद पवारही उपस्थित होते. फायर स्टेशनमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असे दोन पर्याय आहेत. मात्र, फायर सेफ्टी यंत्रणा ऑटोमॅटिक मोडमध्ये असणे आवश्यक आहे. मात्र, संपूर्ण फायर सेफ्टी यंत्रणा मॅन्युअल मोडमध्ये असल्याचे आढळून आले. आता अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. हा धक्कादायक प्रकार एसडीओ अनिल भटकर यांनी तत्काळ जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या निदर्शनास आणून दिला. डफरीन प्रशासनाने सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाला पत्र देऊन फायर ऑडिट करण्याबाबत कळवले होते. मात्र, अद्याप हे फायर ऑडिट पूर्ण झालेले नाही. या घटनेतून धडा घेत जिल्ह्यात यापुढे सुरू झालेले कोणतेही फायर ऑडिट जास्तीत जास्त १५ दिवसांत पूर्ण करण्याची ‘एसओपी’ तयार करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मंगळवारी (दि. २५) माध्यमांशी बोलताना दिली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर मंगळवारी दुपारी डफरीनमध्ये आले होते. त्यांनी आग लागलेल्या ठिकाणाची पुन्हा पाहणी केली. तसेच डफरीनमधील डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी विद्युत विभागाचे अधिकारी आणि व्हेंटिलेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. समिती घटनास्थळाची पाहणी करणार १५ दिवसांच्या आत कोणत्याही परिस्थितीत तपासणी पूर्ण करून अंतिम प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा पद्धतीची एसओपी तयार करण्यात येत आहे.चौकशीसाठी शासनाने सात सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीत एम्सच्या डॉक्टरांचाही समावेश असून आरोग्य विभागाचे आयुक्त समितीचे अध्यक्ष आहेत. ही समिती बुधवारी अमरावतीत येऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहे. सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही मागितले जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन)एसएनसीयूमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेच्या अनुषंगाने सखोल चौकशीसाठी सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सिव्हिल सर्जन यांच्याकडे सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज मागण्यात आले आहे. मृत बाळाचे नातेवाइक एसएनसीयूसमोरच बसून आपले चिमुकले बाळ गमावल्याने नातेवाईक प्रचंड दुःखात आहेत. मंगळवारी दुपारी एका मृत बाळाचे नातेवाईक डफरीनमधील ज्या एसएनसीयूमध्ये आग लागली, त्या ठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी दोषींना सोडू नका, अशी मागणी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *