![]()
माती आणि पाण्याचे संवर्धन ही काळाची गरज आहे. भविष्यातील पिढीचे जीवन सुरक्षित व समृद्ध करण्यासाठी प्रत्येकाने मृद व जलसंधारणाच्या कामात सहभागी व्हावे. विद्यार्थ्यांनी पाणी बचत व पर्यावरण संवर्धनाची चळवळ घराघरापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जलसंधारण विभाग
.
भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मृद व जलसंधारण सप्ताहानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वृक्षदिंडी, जनजागृती रॅली, निबंध व चित्रकला स्पर्धा, ‘पाण्यासाठी चालणे’, ‘रील्स ऑफ चॅलेंज’ आदी उपक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमास कार्यकारी अभियंता गायसमुद्र, जिल्हा समन्वयक शिंदे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, मुख्याध्यापक बन्सी नरवडे, प्रा. एकनाथ होले, डॉ. गोविंद कदम आदी उपस्थित होते. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी, टी-शर्ट व कॅप देऊन गौरविण्यात आले. गायसमुद्र म्हणाले, पाणी वाया जाऊ न देणे, वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि पावसाचे पाणी साठविण्याबाबत विद्यार्थ्यांनी कुटुंब व समाजात जनजागृती करावी. पाणी बचतीची चळवळ घराघरात पोहोचविण्यात विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रा. एकनाथ होले यांनी जलसंधारणाच्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. अहिल्यानगर जिल्हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात असल्याने पावसाचे प्रमाण तुलनेने कमी आहे. हवामान बदलामुळे कमी कालावधीत अतिवृष्टी होत असल्याने माती व पाणी वाहून जाते. त्यामुळे नाला बांध, सिमेंट बंधारे, शेततळी, गाळ काढणे, छतावरील पावसाचे पाणी संकलन, ठिबक सिंचन व पाणलोट विकासावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक प्राचार्य बेरड यांनी केले. कोतकर बाबासाहेब यांनी आभार मानले. शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.