Headlines

सुसाट टेम्पो, पोलिसांचा पाठलाग अन्‌ 41 लाख रुपयांचा गुटखा जप्त!:नाकाबंदी तोडून पळणाऱ्या वाहनाला खर्डा पोलिसांनी गाठले; तिघे ताब्यात‎



धाराशिव येथून बीडकडे टेम्पोतून नेला जाणारा ४१ लाख रुपयांचा गुटखा खर्डा पोलिसांनी जातेगाव फाटा (खर्डा) येथील नाकाबंदी दरम्यान आणि त्यानंतर तेलंगशी गावच्या शिवारात सिनेस्टाईल पाठलाग करून जप्त केला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

.

२४ ऑगस्ट रोजी शिर्डी-हैदराबाद राज्य महामार्गावरून बीडकडे जाणाऱ्या एका संशयित आयशर टेम्पोला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने तो न थांबवता वेगाने पळवून नेला. पोलिसांनी तेलंगशी शिवारात टेम्पो पकडून त्याची तपासणी केली असता, त्यात ४१ लाख ४१ हजार ४८ रुपये किमतीचा गुटखा व सुगंधी सुपारी आढळून आली. पोलिसांनी गुटखा व टेम्पो असा ५१.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राजू मेहबूब शेख (रा. भेंडटाकळी, ता. गेवराई, जि. बीड), प्रदीप विष्णू गायकवाड (रा. चऱ्हाटा फाटा, ता. जि. बीड) आणि तुषार नामदेव कुसळकर (रा. बीड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के यांच्या फिर्यादीवरून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महामार्गावरील नाकेबंदी टाळण्यासाठी मार्ग बदलला धाराशिववरून बीडकडे जाण्यासाठी सहसा राष्ट्रीय महामार्ग ५२ वापरला जातो. हा सर्वांत जवळचा मार्ग आहे. धाराशिववरून येडशी, येरमाळा, चौसाळामार्गे बीड असा हा सोयीचा मार्ग असताना गुटखा तस्करांनी महामार्गावरील नाकेबंदी टाळण्यासाठी व चोरट्या मार्गाने गुटखा तस्करी करण्यासाठी मुख्य मार्ग बदलून अहिल्यानगर जिल्ह्यातून खर्डा परिसरातून जाणाऱ्या मार्गाचा वापर केला. मात्र, तेथेही नाकाबंदी असल्याने ते अहिल्यानगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

वैध गुटखा विक्री आढळल्यास माहिती द्या या कारवाईत ४१ लाख ४१ हजार ४८ रुपये : प्रतिबंधित गुटखा व सुगंधी सुपारी,१० लाख रुपये : आयशर टेम्पो, एकूण ५१ लाख ४१ हजार ४८ रुपये : जप्त मुद्देमाल. अवैध गुटखा विक्री अथवा वाहतूक आढळल्यास नागरिकांनी ११२ क्रमांकावर किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *