![]()
दिंडोरी आणि पेठ नगरपंचायत निवडणुका शिवसेनेने स्वबळावर लढवाव्यात, तसेच त्यासाठी आतापासून सक्षम उमेदवारांची चाचपणी सुरू करावी, असे निर्देश शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे आयोजित दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारस
.
यावेळी व्यासपीठावर संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी आमदार धनराज महाले, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार शिंदे म्हणाले की, दिंडोरी आणि पेठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शासनाकडून मिळालेला निधी जनतेच्या विकासासाठी कशा प्रकारे वापरण्यात आला, हे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठोस व्यूहरचना आखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मतदार याद्यांमधील बोगस नावे वगळणे, नवीन मतदार नोंदणी वाढवणे आणि बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकजुटीने कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार धनराज महाले यांनी मतदारसंघातील सर्व बूथ समित्यांची नियुक्ती पूर्ण झाल्याची माहिती दिली, तर जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी गट व गणनिहाय आढावा सादर केला. बैठकीस मतदारसंघातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.