Headlines

भांडेवाडीत सुपारी देऊन अल्पवयीन मुलांकडून खून:मुख्य सूत्रधार महिलेसह दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात, 1 लाखाची सुपारी




नागपूरच्या भांडेवाडी येथील खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात मुख्य सूत्रधार महिलेसह तिच्या साथीदाराला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. आता गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने खुनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांना एक लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही १७ वर्षीय अल्पवयीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. कन्हान येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार अमन ऊर्फ नाटू पप्पू कैतवार याने त्यांना खुनासाठी एक लाख रुपये रोख दिले होते. काम पूर्ण झाल्यावर अधिक पैसे देण्याचे आमिषही दाखवले होते. अमन कैतवार, कामठीचा अर्जुन आणि यापूर्वी अटक झालेला अभिजीत साखरे यांनी अल्पवयीन मुलांसोबत हा कट रचला होता. मात्र, या हत्येच्या कटाची मुख्य सूत्रधार मनीषा गणेश बोरकर (वय ३७, रा. हनुमान नगर, भांडेवाडी) हीच असल्याचे अल्पवयीन आरोपींनी पोलिसांना सांगितले. खून केल्यानंतर दोन्ही अल्पवयीन आरोपी फरार झाले होते. गुन्हे शाखा युनिट ५ चे पथक ७ जुलै २०२६ रोजी त्यांचा शोध घेत असताना, पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली. हे आरोपी ऑटोमोटिव्ह चौक परिसरातील मारुती शोरूमजवळ दबा धरून फिरत होते. पोलिसांनी तातडीने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. हनुमान नगर, भांडेवाडी येथील ६२ वर्षीय सुशीला प्रितमलाल बोरकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अल्पवयीन मुलांनी गुन्ह्यासाठी मिळालेले पैसे खर्च झाल्याचे सांगितले. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पालकांसह भांडेवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आता पोलीस कन्हानचा रेकॉर्डवरील गुन्हेगार अमन ऊर्फ नाटू कैतवार आणि कामठीचा अर्जुन या फरार आरोपींचा शोध घेत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *