Headlines

पिंपरी-चिंचवडच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी:पोलिस आयुक्तालयाच्या हेल्पलाइनवर कॉल, रवी लांडगे यांना मारण्याचा इशारा




पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि भाजप नेते रवी लांडगे यांना थेट पोलीस आयुक्त कार्यालयात फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पिंपरी आणि पुणे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. धमकी देणाऱ्याने थेट पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या (CP Office) नियंत्रण कक्षात फोन केला. फोनवर त्याने ‘मी रवी लांडगे यांना जीवे मारणार आहे’, अशी थेट धमकी दिली. नियंत्रण कक्षातील पोलिसांनी तात्काळ याची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि रवी लांडगे यांना याबाबतची माहिती दिली. ‘त्याने मला आधी पुस्तकही भेट दिलं होतं…’ पोलिसांकडून तरुणाला गाठले अन् थेट सीपी ऑफिसमध्ये फोन आल्यामुळे पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला. तातडीने कारवाई करत संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. भोसरी पोलिसांनी या तरुणाला ताकीद देऊन सोडल्याचे समजते. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मला किंवा माझ्या कुटुंबाला थेट फोन करून धमकी दिली नाही. त्याने पोलिस हेल्पलाईनवर धमकी दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला केवळ समज देऊन सोडले, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली. राजकीय वर्तुळात चिंता पिंपरी-चिंचवडमध्ये रवी लांडगे हे एक वजनदार राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. एका बड्या नेत्याला अशा प्रकारे थेट पोलीस आयुक्तालयाला आव्हान देत धमकी मिळणे, ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने चिंतेची बाब मानली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *