Headlines

हिंगोलीत दारूच्या नशेत दोन तरुणांचा मृत्यू:एकाचा कालव्यात बुडून तर दुसऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या




हिंगोली जिल्ह्यात दारुच्या नशेत दोन वेगळ्या घटनेमध्ये एकाने गळफास घेऊन तर एकाचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कळमनुरी व कुरुंदा पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 20 अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील अरविंद वाघमारे (35) हा कळमनुरी तालु्क्यातील सुकळी वळण शिवारात नातेवाईकांकडे गेला होता.यावेळी दारुच्या नशेत तो इसापूर धरणाच्या कालव्यात पडला. त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिल्पा वाघमारे यांनी दिलेल्या माहितीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार शेळके, जमादार पोले पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, अन्य एका घटनेमध्ये वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील गंगाधर बोराडे (38) याला दारु पिण्याचे व्यसन होते. दारुच्या नशेत त्याने घरी कोणी नसल्याचे पाहून घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.या प्रकरणी सावळाराम बोराडे यांच्या माहितीवरून कुरुंदा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार भगवान वडकिले पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामीण भागातून दारूच्या नशेत मृ्त्यूच्या दोन घटनामुळे बेकायदेशीर दारु विक्रीचा प्रश्‍न पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे. ग्रामीण भागातून सर्रासपणे अवैध दारु विक्री होत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे महिलांनी गावातील दारु बंद करण्याचे निवेदन देऊनही त्या निवेदनाला उत्पादन शुल्क विभागाकडून केराची टोपली दाखवली जात असल्याने या विभागाचे बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्यांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *