![]()
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त राज्यभर विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर आधार
.
हा विशेष चित्ररथ समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खा. समीर भुजबळ व आ. पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे. ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत हा चित्ररथ राज्यातील गावोगावी व शहरा-शहरांत फिरून समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहे. चित्ररथामध्ये सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसह महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा विशेष आकर्षण ठरत आहे. तसेच महात्मा फुले लिखित पुस्तके, पेन यासारख्या ज्ञानाच्या प्रतीकांची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे.
पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाडा तसेच भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेची प्रतिकृती चित्ररथात साकारण्यात आली आहे. समता,बंधुता, न्याय आणि शिक्षणाचा संदेश देणारा हा चित्ररथ मोर्शी शहरात दाखल होताच ढोल पथकाच्या गजरात, फटाके फोडून व फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले. यावेळी मोर्शी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. चौकात चित्ररथाचे आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करताना उपस्थित मान्यवर व इतर.
जयस्तंभ चौक व छत्रपती शिवाजी चौक येथेही चित्ररथाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या वेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर लेकुरवाडे, नगरसेवक रवींद्र गुल्हाने, नगरसेविका कांचन भोजने, वैभव भोजने, नितीन राऊत, मोहन मडघे, महेंद्र भातकुले, प्रशांत आजनकर, राजेंद्र भोजने, मंगेश भोजने, विनायक खाडे, किशोर सारडे, प्रशांत कांडलकर, अंबादास सिनकर, घनश्याम सिंगरवाडे, अनिकेत राऊत, गजानन अरसडे, सतीश लेकुरवाडे, सागर पाटील, सोनाली नवले यांच्यासह शिव, शाहू, फुले, आंबेडकर विचारांच्या नागरिकांनी स्वागत उत्साहात स्वागत केले.