Headlines

Trinamool-Election Commission meets for 11 minutes, political dispute flares up before West Bengal elections


  • Marathi News
  • National
  • Trinamool Election Commission Meets For 11 Minutes, Political Dispute Flares Up Before West Bengal Elections

नवी दिल्ली/कोलकाता12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेस आणि निवडणूक आयोग यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. बुधवारी दिल्लीत झालेली बैठक वादातच संपली, त्यानंतर दोन्ही पक्ष सोशल मीडियावर आमने-सामने आले. आयोगाने तृणमूलचे नाव घेऊन सोशल मीडियावर पोस्ट केली असून, हे अत्यंत दुर्मिळ मानले जात आहे. सकाळी १० वाजता सुरू झालेली ही बैठक १०:११ वाजता संपली.

तृणमूल खासदार डेरेक ओ’ब्रायन म्हणाले की, आम्ही अशा ६ अधिकाऱ्यांचे पुरावे दिले आहेत ज्यांचे भाजपशी संबंध आहेत. जेव्हा असे अधिकारी कार्यरत असतील तेव्हा निष्पक्ष निवडणुका कशा होतील, असा प्रश्न मुख्य निवडणूक आयुक्तांना विचारला असता आम्हाला ‘चालते व्हा’ असे सांगण्यात आले. दुसरीकडे, आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, तृणमूल काँग्रेस नेते ओरडत होते.

भवानीपूरमधून अर्ज; नावे वगळणे हे कारस्थान – ममता

ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील कालीघाट निवासस्थानापासून रोड शो करत भवानीपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजप व आयोग संगनमताने खऱ्या मतदारांची नावे वगळत असून हे लोकशाही कमकुवत करण्याचे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला.

संघर्ष… बंद खोलीतील वाद सोशल मीडियावर

  • निवडणूक आयोगाने एक्स हँडलवर लिहिले की, निवडणूक आयोगाने तृणमूलला ठणकावून सांगितले की, बंगालमध्ये या वेळी निवडणूक भयमुक्त, हिंसाचारमुक्त, प्रलोभनमुक्त, छापासत्रमुक्त व बूथ जामिंगमुक्त होऊनच राहील.
  • तृणमूल काँग्रेसने याला उत्तर देताना आपल्या एक्स हँडलवर लिहिले की, या वेळी निवडणुका दिल्लीच्या नियंत्रणातून मुक्त, राजकीय पक्षपातापासून मुक्त, निवडक टार्गेटिंगपासून मुक्त व दुटप्पी धोरणांपासून मुक्त असायला हव्यात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *