Headlines

‘पैशांची मनीषा’ हेच पेपर फुटीचे कारण- सीबीआय:पुण्यातील फिजिक्स पेपरसेटर मनीषा हवालदारची कबुली




नीट पेपरफुटीप्रकरणी अटकेतील पुण्यातील फिजिक्सची पेपरसेटर मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न फोडले. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने संभाव्य प्रश्नांच्या नोट्स जाळूनही टाकल्या, अशी कबुली तिने दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. दरम्यान, सलग ९ दिवसांपासून लातुरात ठाण मांडून बसलेल्या सीबीआयच्या पथकाने शनिवारी दुपारी प्रा. शिवराज मोटेगावकरच्या ‘आरसीसी’च्या कार्यालयात दुपारी ४ ते रात्री ८ वाजेनंतरही ठाण मांडून संगणकातील माहिती तपासली. प्रा. मोटेगावकरने त्याच्याकडे आलेले नीटचे प्रश्न हाताने लिहून काढले होते. म्हणून त्याचे हस्ताक्षर तपासण्याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली. दरम्यान, लातूरच्या २ आयुर्वेदिक, २ दोन बालरोगतज्ज्ञांची आतापर्यंत चौकशी झाली. यातील ३ डॉक्टरांच्या मुलांनी या वर्षी नीट दिली. सीबीआयचे साक्षीदार डॉ. मनोज शिरुरेंच्या मित्रांच्या वर्तुळात अन्य डॉक्टर होते. त्यामुळे पेपर विक्रीची त्यांच्यात लिंक असू शकते, असे सीबीआयचे म्हणणे आहे. सीबीआय कारवाईच्या तयारीत नाशिक | नीट पेपर फूट प्रकरणात अटक झालेल्या शुभम खैरनारने उत्तर महाराष्ट्रातील कोणकोणते क्लास चालक, एजंट त्याच्या संपर्कात होते, याची यादीच सीबीआयच्या स्वाधीन केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्याने जबाबात सांगितले की, काही नामांकित क्लासचालकांनी त्याच्याशी तसेच आणि त्याच्या टोळीतील सदस्यांशी संधान साधले होते. पेपर मिळवून देणे, परीक्षा केंद्र मॅनेजसाठी प्रतिविद्यार्थी २५ ते ४० लाख रुपयांची बोली लावली जात होती. यातील मोठा हिस्सा खैरनार आणि बिहार-दिल्लीतील मुख्य सूत्रधारांपर्यंत जात होता, तर उर्वरित रक्कम कमिशन म्हणून स्थानिक क्लास चालक स्वतःकडे ठेवत होते. कारवाईच्या संकेताने अनेक क्लास, हॉस्टेल, हॉटेल्स शनिवारी बंद होते लातूर | शहरातील उद्योग भवन परिसरातील व्यावसायिक गाळे तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून जारी झाल्यानंतर शहरातील प्रसिद्ध ट्यूशन एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी दिलेल्या पत्रानंतर गाळाधारक, क्लासेस चालक आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले या परिसरातील शनिवारी अनेक ट्यूशन क्लासेस बंद ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर काही हॉस्टेल्स, हॉटेल्स, नाष्टा सेंटर आणि इतर व्यावसायिक आस्थापनांनीही खबरदारीचा उपाय म्हणून शटर डाऊन ठेवले होते. हवालदारला दोन लाख पगार, मुलगा व मुलगी अमेरिकेत मनीषा हवालदार सदाशिव पेठेतील लक्ष्मी निवास इमारतीत चौथ्या मजल्यावर २३ वर्षांपासून राहते. तिचे पती खाजगी बँकेतून कंपनीतून निवृत्त झाले आहेत. तिचे ८० वर्षीय वडील पाच ते सहा वर्षांपासून त्यांच्यासोबत राहतात. तिचा मुलगा नकुल, मुलगी नेहा ५-६ वर्षांपासून शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. व्हॉट्सॲप, प्रिंटने प्रश्न दिले सीबीआयने म्हटले आहे की, हवालदारने अनुवादक म्हणून काम करताना प्रश्न हस्तलिखित नोंदीरूपात लिहून ठेवल्या. मग मनीषा मांढरे, इतरांशी संगनमत करून हे प्रश्न व्हॉट्सॲप आणि प्रिंटआउट्स काढून काही खास विद्यार्थ्यांना पुरवले. या कामासाठी तिने रोख रक्कम घेतली. तपास यंत्रणांच्या हाती पुरावे लागू नयेत म्हणून हवालदारने भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या नोट्स जाळून टाकल्या. तशी कबुली तिने दिली. तसेच मांढरेसोबतचे चॅटिंगही डिलीट केले. हवालदारने पतीच्या फोनवरूनसुद्धा मनीषा मांढरेला प्रश्न पाठवल्याचे सीबीआयला दिसून आले आहे. नीट तयारीसाठी टेस्ट सिरीज सुरू नीट पेपरफुटी प्रकरणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊ नये, यासाठी लातूरमधील क्लासेसचालक विशेष काळजी घेत आहेत. मोटेगावकरच्या क्लासमध्ये टेस्ट सिरीज ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *