![]()
जालन्याहून उपचारासाठी शहरात आलेल्या महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेले. सिडको बसस्थानकावर उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून ‘हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे’ असे सांगत मदतीचा आर्त प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच फोन बंद झाला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३७ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार, त्यांची जालन्यात राहणारी ३९ वर्षांची पीडित बहीण या २१ मे रोजी सायंकाळी उपचारासाठी शहरात येण्यासाठी बसने निघाल्या होत्या. त्यांच्या आईने त्यांना जालन्यातून बसमध्ये बसवले होते. सायंकाळी ६.३० वाजता पीडितेने बहिणीशी संपर्क साधून मी ट्रॅफिकमध्ये आहे असे सांगितले होते. त्यानंतर साडेसातच्या सुमारास त्यांनी सिडको बसस्थानकावर पोहोचल्याचे सांगून रिक्षाने चिकलठाण्याकडे निघाल्याची माहिती दिली. ‘हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊ जात आहे…’ अवघ्या काही मिनिटांत रात्री ७.४८ वाजता पीडितेने फिर्यादीला पुन्हा फोन करून घाबरलेल्या आवाजात मी रिक्षात बसलेली आहे… हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे असे सांगितले आणि कॉल अचानक कट झाला. त्यानंतर त्यांचा मोबाइल बंद लागत नसल्याने कुटुंबीयांनी तातडीने डायल ११२ वर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात, आरोपीचा शोध सुरू कुटुंबीयांनी सिडको बसस्थानक, परिसरातील रुग्णालये व इतर ठिकाणी शोध घेतला. मात्र महिला आढळून आली नाही. अखेर चिकलठाणा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून रिक्षाचालकांचा शोध सुरू केला आहे. पुढील तपास सहाकय फौजदार भास्कर राऊत करीत आहेत.
Source link
जालन्याहून बहिणीच्या घरी जाणाऱ्या महिलेचे रिक्षा चालकाने केले अपहरण:एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल