Headlines

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दरे गावाच्या दौऱ्यावर:नेमके कारण काय? जिल्हा परिषदेच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला राजकीय रंग




उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तीन दिवसांचा सातारा दौरा सुरु झाला असून त्यांच्या दरेगाव भेटीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा दौरा अधिकृतपेक्षा खाजगी असल्याचे सांगितले जात असले तरी, अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय नजरेने पाहिले जात आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत मोठे राजकीय नाट्य रंगले होते. या निवडीदरम्यान शिवसेना आणि भाजपमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यातच नवनिर्वाचित अध्यक्षांच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू झालेला कायदेशीर वाद आणि तक्रारदारांनी घेतलेला आक्षेप यामुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणे अस्थिर झाली आहेत. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी सातारा जिल्हा असल्याने मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यात ‘डॅमेज कंट्रोल’ संदर्भात काही ठोस निर्णय घेतले जाण्याची दाट शक्यता आहे. दौऱ्याला राजकीय रंग गुरुवारी दुपारी हेलिकॉप्टरने शिंदे यांचे दरेगावात आगमन झाले. ते येथे मुक्काम करणार असून स्थानिक पातळीवरील काही भेटीगाठी आणि चर्चा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद निवड प्रक्रियेतील घडामोडी, त्यानंतर निर्माण झालेला वाद, तसेच सत्तासमीकरणातील बदल यामुळे या दौऱ्याला राजकीय रंग चढला आहे. शिंदेंचा दौरा खासगी की राजकीय? दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई आणि इतर स्थानिक नेत्यांच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या या भेटीकडे लक्ष लागले आहे. विशेषतः जिल्हा परिषद निवडीनंतर शिवसेना आणि भाजपमधील निर्माण झालेल्या तणावाच्या संदर्भात या दौऱ्यात काही राजकीय संदेश दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदेंच्या दरे गावी मुक्कामादरम्यान महत्त्वाच्या बैठका किंवा अंतर्गत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा दौरा केवळ वैयक्तिक की राजकीय रणनीतीचा भाग, याबाबत पुढील दोन-तीन दिवसांत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. एकूणच, मुख्यमंत्र्यांचा हा ‘गाव दौरा’ केवळ विश्रांतीपुरता मर्यादित नसून, सातारा जिल्ह्यातील बिघडलेले राजकीय समीकरण दुरुस्त करण्यासाठीची ही एक महत्त्वाची ‘फिल्डिंग’ असल्याचे बोलले जात आहे. हे ही वाचा… बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार:सुनील तटकरेंनी मानले आभार, म्हणाले – त्यांनी सामंजस्यपणा दाखवला बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत अखेर मोठा पेच सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या काँग्रेसने अखेर या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वागत केले आहे. तटकरे यांनी काँग्रेसचे आभार मानताना जुन्या राजकीय स्मृतींना उजाळा दिला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *