![]()
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. राजकीय हालचालींना वेग आला. 18 जून रोजी होणारे मतदान आणि 22 जूनच्या मतमोजणीपूर्वी ”महायुती”मध्ये जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजते. महायुतीत भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघाची एकमेव जागा जाण्याची दाट शक्यता आहे, असे झाले तर अहिल्यानगरची हक्काची जागा भाजप स्वत:कडेच ठेऊ शकते. अहिल्यानगरची जागा भाजपकडे जाण्यामागे वरिष्ठ पातळीवरील महायुतीचे अंतर्गत राजकीय गणित कारणीभूत ठरू शकते. महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार सुनील तटकरे हे त्यांचा हक्काचा बालेकिल्ला पक्षाकडे ठेवण्यासाठी कसोशिने प्रयत्न करतील. राष्ट्रवादीला रायगडची एकमेव जागा मिळाली तर दुसऱ्या जागेसाठी पाहिजे तसा आग्रह करता येणार नाही. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर या जागेसाठी हट्ट धरणारा किंवा भाजपला थेट आव्हान देणारा वजनदार नेता सध्या राष्ट्रवादीकडे नाही. त्यामुळे रायगडच्या बदल्यात अहिल्यानगरवरचा दावा सोडणे राष्ट्रवादीला भाग पडू शकते. भाजपने ऐनवेळी जर फॉर्म्युल्यात बदल करून राष्ट्रवादीला जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतल्यास अहिल्यानगरची जागा मिळण्याची आशा राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहे. फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यास शिवसेनेचीही साथ भाजपसोबत महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचीही चांगलीच ताकद वाढली आहे. त्यांचे शेवगाव नगर परिषद, नेवासे नगर पंचायतीत त्यांचा नगराध्यक्ष आहे. महायुतीतील संभाव्य फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाल्यास शिवसेना शिंदे गटाची ताकदही भाजपच्या पाठिशी राहण्याची शक्यता आहे. या स्पष्ट आकडेवारीमुळे राष्ट्रवादी येथे पूर्णपणे बॅकफूटवर गेली असून, भाजपचा विजय अधिक सुकर मानला जात आहे. 461 पैकी सर्वाधिक
199 मतदार भाजपचे गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवारगट) ताब्यात असलेली ही जागा आता भाजप स्वतःकडे खेचून घेण्याच्या तयारीत आहे. त्यामागे कारणही तसे भक्कम आहे. जिल्ह्यात 11 नगरपरिषदा, 4 नगर पंचायती आणि छावणी परिषद मिळून एकूण 461 मतदार आहेत. यात एकट्या भाजपचे हक्काचे 199 भाजपचे नगरसेवक मतदार आहेत. यात संगमनेर सेवा समितीचे 33 आणि राहुरीतील जनविकास आघाडीचे 17 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाला तर हा आकडा 249 वर जातो. त्यानुसार भाजपचा उमेदवार स्वबळावरही सहज विधान परिषदेवर जाईल. त्यामुळे कागदावर राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपच भक्कम दिसत आहे. शब्द पाळला जाणार की
निष्ठावंतांचा पुन्हा “त्याग” जिल्ह्यात राजकीय परिस्थिती पाहता भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी वेळोवेळी अनेक तडजोडी करण्यात आल्या. याआधीच्या निवडणुकांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द देऊन भाजप तसेच मित्रपक्षांच्या उमेदवारांना निवडून आणले. त्याप्रमाणे शब्दाला मान देणाऱ्या नेत्यांना संधी दिली गेली. नुकतेच विवेक कोल्हे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. आता या जागेवर भाजपने उमेदवार द्यायचे ठरल्यास शब्द पाळला जाणार की निष्ठावंतांना पुन्हा त्याग करावा लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Source link
अहिल्यानगरात भाजपच्या ताकदीसमोर राष्ट्रवादी बॅकफूटवर,:राष्ट्रवादीला रायगडची जागा जाण्याची शक्यता असल्याने नगरची जागा जाऊ शकते भाजपकडे