![]()
शहरात वाढत्या अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून मंगळवारी २६ मे रोजी विशेष धडक मोहीम राबवण्यात आली. शहरातील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या २९ वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान संबंधित वाहनधारकांकडून एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात काही दिवसांपासून नियमबाह्य पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी वाहतूक शाखेकडे प्राप्त होत होत्या. त्यानुसार शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम आखून विविध चौक, मुख्य मार्ग आणि गर्दीच्या भागात तपासणी मोहीम राबवली. तपासणीदरम्यान परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली. याबाबत माहिती देताना बाळासाहेब किसनराव नाईक यांनी सांगितले की, अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असून, वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होत आहे. त्यामुळे अशा वाहनांविरुद्ध पुढेही सातत्याने धडक कारवाया करण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी अवैध प्रवासी वाहतूक, वाहतुकीचे नियम मोडणे किंवा सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणाऱ्या वाहनांविषयी शहर वाहतूक शाखेशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत सहायक पोलिस निरीक्षक बाळासाहेब नाईक यांच्यासह सपोउपनि रविंद्र लोखंडे, संगिता शिंदे, सुनिल वाणी, दिपक मुळे, विष्णू सावळे आणि चालक रामेश्वर दोनतकर यांचा सहभाग होता.
Source link
29 वाहन धारकांना 2 लाख 90 हजाराचा दंड:अवैध वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर