Headlines

सिद्धिविनायक कॉरिडॉरमुळे प्रभादेवीत संघर्षाची ठिणगी:मैदानावरील पार्किंगवर रहिवाशांनी घेतला आक्षेप




सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर प्रकल्पांतर्गत प्रभादेवी येथील ऐतिहासिक नर्दुल्ला टँक मैदानावर प्रस्तावित पार्किंगच्या निर्णयाने विकासाच्या आराखड्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मंदिराच्या सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असला, तरी या निधीतून उभारल्या जाणाऱ्या सुविधांमुळे स्थानिक रहिवाशांच्या हक्काच्या मोकळ्या जागेवर गदा येत असल्याचे समोर आले आहे. या मुद्द्यावरून आता उबाठा आणि स्थानिक रहिवासी आक्रमक झाले असून, हे मैदान वाचवण्यासाठी त्यांनी थेट प्रशासनाला आव्हान दिले. आमदार सावंतांचा इशारा : स्थानिक आमदार महेश सावंत यांनी या प्रकल्पातील त्रुटींवर बोट ठेवताना प्रशासकीय नियोजनाचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. ते म्हणाले की, “मेट्रोच्या कामावेळीच अंडरग्राउंड पार्किंगचा पर्याय उपलब्ध होता, परंतु आता नागरिकांच्या हक्काच्या मैदानावर अतिक्रमण करण्याचा घाट घातला जात आहे. जर सरकारकडे ५०० कोटींचा निधी आहे, तर तो परिसर विकासासाठी किंवा पर्यायी जागेवर पार्किंगची इमारत बांधण्यासाठी खर्च करावा. मैदानावर पार्किंग का? काय आहे पेच? प्रशासकीय नियोजनानुसार, मंदिर परिसरात वाढणारी गर्दी आणि वाहनांची कोंडी सोडवण्यासाठी नर्दुल्ला टँक मैदानावर पार्किंगची सुविधा देण्याचा विचार केला जात आहे. मात्र, या मैदानाचे अस्तित्वच धोक्यात येणार असल्याने हा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. नर्दुल्ला टँक हे येथील लहान मुलांचे खेळण्याचे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्याचे एकमेव ठिकाण आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *