Headlines

रेडे कापून आलेले सरकार कुर्बाणीला विरोध करतंय:मंत्र्यांच्या हॉटेलात मटण विकतात, मग बंदी कशाला?,महाराष्ट्र क्षत्रिय धर्म पाळतो, मांसाहार करणारच- संजय राऊत




महाराष्ट्राचे सरकार बळी देऊन आलेले सरकार आहे. देवळात बळी देऊन आलेले हे सरकार आहे. कामाख्या देवीच्या मंदिरात 55 रेडे कापण्यात आले ती सुद्धा कुर्बाणीच आहे ना? तिच्यावर आक्षेप घेतला पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. जे सरकार रेडे कापून सत्तेत आले ते दुसऱ्याच्या कुर्बाणीला विरोध करत आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रात मांसाहार केला जाईलच. संजय राऊत म्हणाले की, काल राज्यांमध्ये मुस्लीम सणावरुण दंगलीचा प्रयत्न झाला ते महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. मंत्रिमंडळातील अर्धा लोकांची हॉटेल आहेत तिथे ते मटण विकतात, त्यांनी ते बंद करावे आणि श्रीखंड पुरी विकायला सुरूवात करावी. महाराष्ट्र हा मांसाहारी आहे, महाराष्ट्र क्षत्रिय धर्माचे पालन करणारा आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय मराठा आहेत. तुम्ही महाराष्ट्रावर काय लादत आहात? हे अत्यंत चुकीचे आहे. ..तर शहा कनेक्शन असतेच संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीचे केंद्रबिंदू लातूरपासून पुण्यात पसरलेला असेल तर त्यांची जबाबदारी ही देशाचे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या इतकीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा आहे. काही वाईट झाले तर त्यांचे शहा कनेक्शन असतेच म्हणूनच की काय या प्रकरणी तेजस शहाला सीबीआयने अटक केली आहे. फडणवीस नीट पेपरफुटीची जबाबदारी घेणार? संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी घेणार आहेत का? लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे त्यांचा केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे. एका पिढीचे आयुष्य तुम्ही बरबाद केले आहे. यावर देवेंद्र फडणवीस काही बोलायला तयार नाही. त्यांनी किमान एक पत्रकार परिषद तरी घ्यावी. पेपरफुटीच्या मागे भाजप आहे. आपल्या लोकांना पेपर आधी मिळावे आणि त्यांना चांगला स्कोर मिळावा यासाठी भाजपने हे केले आहे. पेपरफुटीवर राज्य सरकारची भूमिका काय? संजय राऊत म्हणाले की, भाजपने न्यायव्यवस्था,पोलिस, निवडणूक आयोग जसे ताब्यात घेतले तसेच स्पर्धा परीक्षा घेणारी व्यवस्था ताब्यात घेत भाजपने देशाचे वाटोळे केले आहे. त्यांचा केंद्र बिंदू महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेला देशात सन्मान होता ते पेपरफुटीचे केंद्र म्हणून समोर आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनी त्यांच्यावर काय भूमिका घेतली आहे. राज्याचे पोलिस त्यावर काही कारवाई करत नाही, त्यावर सीबीआयकडून कारवाई सुरू आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *