Headlines

कॅनमध्ये डिझेल न दिल्याने पंपावर राडा, मालकासह कर्मचाऱ्यांना मारहाण:पाचपुते बंधूंसह 15 जणांवर गुन्हा, तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण‎



तालुक्यातील काष्टी येथे भरदिवसा एका पेट्रोल पंपावर ‘कॅन’मध्ये डिझेल दिले नाही म्हणून मालकासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत केबिन आणि काचांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांचे बंधू दीपक ना

.

बुधवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास काष्टी येथील पेट्रोल पंपावर डिझेल भरण्याच्या कारणावरून किरकोळ वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही तरुण तिथून निघून गेले. मात्र, काही वेळातच आरोपींचा मोठा जमाव हत्यारांसह पंपावर परतला. त्यांनी थेट पंपाचे मालक कृष्णा नागवडे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी केबिनच्या काचा फोडल्या, पंपावरील साहित्याची तोडफोड केली आणि कृष्णा नागवडे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली.

या राड्यादरम्यान मध्यस्थी करायला आलेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनाही जमावाने बेदम चोप दिला. यामध्ये कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरदिवसा घडलेल्या या गुंडगिरीमुळे पंप परिसरात आणि काष्टी गावात काही काळ प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी कृष्णा नागवडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिसांनी विशाल रावसाहेब पाचपुते, अभिजित रावसाहेब पाचपुते, प्रतीक बाळासाहेब पाचपुते यांच्यासह अन्य ११ ते १२ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर खिळदकर करत आहेत. नागवडे विरुद्ध पाचपुते असा थेट संघर्ष या निमित्ताने समोर आल्यामुळे “पेट्रोल पंपावर डिझेलपेक्षा तालुक्याचे राजकारणच जास्त पेटले आहे,” अशी चर्चा आता श्रीगोंदे तालुक्यात रंगू लागली आहे.

नियम पाळला म्हणून मार खाल्ला! “सध्या शासकीय नियमानुसार कॅन किंवा बाटलीमध्ये सुटे डिझेल-पेट्रोल देण्यास सक्त मनाई आहे. याच नियमाचे पालन करत काष्टी येथील पंपावर आलेल्या काही तरुणांना ७ लिटर डिझेल कॅनमध्ये देण्यास मालक कृष्णा नागवडे यांनी नकार दिला. नियम समजावून सांगत असतानाच त्या तरुणांनी थेट दादागिरी भाषा वापरली आणि काही क्षणातच शेकडो कार्यकर्त्यांना बोलावून हा जीवघेणा हल्ला केला,” अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *