![]()
अजित पवार यांनी स्थापन केलेला पक्ष भविष्यात राहत नाही. आता छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, प्रफु्ल पटेल, धनंजय मुंडे हे आता पश्चताप करत असतील की का अजित पवारांना शरद पवारांपासून दूर करत भाजपसोबत आणले, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.आता हे पाहणं आमचे राजकीय काम आहे. महायुतीचे लोकं निवडून आलेले आहेत त्यामुळे विधान परिषदेला त्यांचे उमेदवार विजयी होतील यात नवहन असे काही नाही. संजय राऊत म्हणाले की, काही विशिष्ट भाग सोडला तर आमच्याकडे संख्याबळ नाही. काही मतदारसंघात आम्ही उमेदवार देणार आहोत. महायुतीच्या मतभेदाचा आम्हाला फायदा होणार नाही, कारण आमच्याकडे संख्याबळ नाही असे राऊतांनी म्हटले आहे. काँग्रेसला जागा लढवू द्या, त्यांना खूमखूमी आहे. आम्ही कोकणची जागा लढवण्यावर विचार करतोय. बिनविरोध होऊ नये असे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यावर तिन्ही पक्षाचे नेते चर्चा करतील. सिद्धरामय्या यांच्याबद्दल आदर वाढला संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकात मुख्यमंत्री असलेल्या सिद्धरामय्या यांनी काल राजीनामा दिला हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. पण त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर वाढला आहे. इतक्या शांतपणे कोणी आपले पद सोडत नाही. ते तिथले लोकनेता आहेत. पक्षाने आदेश दिला आणि त्यांनी पदाचा राजीनामा दिला हे खूप कमी वेळा होते, त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदर वाढला. काही लोकांना आपल्याच राज्यात काम करावे वाटते म्हणून सिद्धरामय्या यांनी राज्यसभेसाठी नकार दिला असेल. आर्मी काय काय करणार आहे? संजय राऊत म्हणाले की, नीट पेपरफुटीचा अड्डा हे महाराष्ट्रातील लातूर आहे. एका नीटच्या विद्यार्थ्याने निराशेत आत्महत्या केली. मग राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काही जबाबदारी आहे की नाही. ते इतके मोठे नेते आहेत, त्यांनी इतके सरकार बनवले आणि क आमदार-खासदार विकत घेतले. त्यांच्या हाती इतकी मोठी यंत्रणा असताना त्यांच्या नाकाखाली नीट पेपरफुटीचे काम सुरू होते, त्यामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी झाली. आता परीक्षा घेण्यासाठी आर्मीला बोलवण्यात आले आहे. आर्मी काय काय करणार आहे? ते दहशतवाद्याच्या विरोधात लढतील की, बॉर्डरवर सुरक्षा ठेवतील? की कोणते मोठे संकट आल्यावर तिथे जातील. आता परीक्षा घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे, ते काय त्यांचे काम आहे का? असा सवाल राऊत यांनी केला आहे. सुप्रीम कोर्ट सरकारच्या सांगण्यावर निर्णय देते संजय राऊत म्हणाले की, मी ऐकले की नीट पेपर प्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लक्ष घालणार आहेत. म्हणजे काय ते सेंटरवर जाऊन बसणार आहेत का? असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे. महाराष्ट्र याचे केंद्र कसे बनले याची चौकशी झाली पाहिजे, हे सर्व लोकं भाजपशी संबंधित आहेत. मोटेगावकर असो की कुलकर्णी, तेजस शहा, मांढरे, हवालदार असो मी या लोकांचा आणि आरएसएसचा आणि भाजपचा कसा संबंध आहे हे तुम्हाला सांगू शकतो. हे सर्व भाजपचे समर्थक आणि कार्यकर्ते आहे. सुप्रीम कोर्टाचा विषयच सोडा जे सरकार सांगेल तसे ते निर्णय देतील. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा संजय राऊत म्हणाले की, राज्यात रुग्णवाहिका न मिळाल्याने पोटातच बाळ दगावल्याप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण ते सांगताय की देशात काही समस्या नाही.
Source link
अजित पवारांचा पक्ष भविष्यात टिकणार नाही:भुजबळ ते पटेल पश्चाताप करत असतील, विधान परिषदेसाठी विशिष्ट भाग सोडला तर संख्याबळ नाही- संजय राऊत