Headlines

विनायक पाटलांसह 25000 कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश!:विरोधकांनी येऊन हा महासोहळा पाहावा, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना सणसणीत टोला




लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विराट मेळाव्यात एक लक्षवेधी पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात माजी आमदार विनायक पाटील यांच्यासह तब्बल 25 हजार कार्यकर्त्यांनी हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची राजकीय ताकद आता कैक पटींनी वाढली आहे. लातूरमध्ये पार पडलेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या सोहळ्याला आतापर्यंतचा सर्वात मोठा पक्षप्रवेश सोहळा असल्याचे सांगत, आजचा पक्षप्रवेश सोहळा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सोहळा असल्याचे सांगत विरोधकांच्या डोळ्यात कचरा गेला असेल तर त्यांनी येथे येऊन शिवसेनेचा हा महासोहळा पाहावा. लोकांनी आपल्या कामाची पर्वा न करता प्रेमापोटी येथे गर्दी केली आहे, असा सणसणीत टोला लगावला आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आजच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यामध्ये 25 हजार लोकांनी प्रवेश केला आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आजचा पक्षप्रवेश सोहळा सर्वात मोठा पक्ष प्रवेश सोहळा ठरला आहे. दिल्लीमधे शेतकऱ्यांच्याबाबत बैठक होती. त्यासाठी कालची सभा आजवर ढकलली होती. आजची गर्दी ही जमावाजमव करुन आलेली नाही. विरोधकांच्या डोळ्यात जर कचरा गेलेला असेल तर इकडे या आणि उघडा डोळे बघा नीट. विनायकरावांच्या प्रेमापोटी लोक इथे आले आहेत. माझ्या लाडक्या बहीणांना मी धन्यवाद देतो. हा प्रेम जिव्हाळा विकत घेता येत नाही. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, विनायकरावांच्या कार्यकर्त्यांनी आज आंनदोत्सव साजरा केला आहे. शेतकऱ्यांते नेते शंकर अण्णा धोंडगे हेही इथे आहेत. दिव्यांगाचे आणि शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू, आनंद परांजपे यांनी प्रवेश केला. आजचा दिवस महत्वाचा आहे. कारण विनायकरावांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. विनायकराव पाटील यांच्या नावात विनायक आहे, ते नव्याने श्री गणेशा करीत आहेत. त्यांनी मंत्री, आमदार म्हणून काम केलेले आहे ते अनुभवी नेते आहेत. अशा या पक्षप्रवेशामुळे विकासाचे राजकारण कुठे आहे ते कळते आहे. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार हेमंत पाटील, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार सुधाकर भालेराव आणि युवासेनेचे मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण आदी प्रमुख नेत्यांची विशेष उपस्थिती होती. या दिग्गज नेत्यांसोबतच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच परिसरातील महिला, शेतकरी आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *