Headlines

अवैध व्यवसायाची माहिती लपविणे पडले महागात:कळमनुरी तालुक्यातील तीन पोलिस पाटील निलंबीत, उपविभागीय अधिकाऱ्यांचे आदेश




कळमनुरी तालु्क्यातील अवैध व्यवसायाची माहिती लपविणाऱ्या तीन पोलिस पाटील यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले असून याबाबतचे आदेश उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी सोमवारी ता. ३१ काढले आहेत. या आदेशामुळे तालुक्यातून एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्हयात अवैध व्यवसायाला लगाम लावण्यासाठी पोलिस विभागाने छापासत्र सुरु केले आहे. गावपातळीवर सुरु असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती त्या् त्या गावच्या पोलिस पाटील यांनी संबंधित पोलिस ठाण्यांना देणे अपेक्षीत आहे. या संदर्भात पोलिस अधिक्षक कार्यालयाने जिल्हयातील सर्व पोलिस पाटील यांना पत्र पाठवून गावातील अवैध व्यवसायाची माहिती देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. दरम्यान, त्यानंतरही काही ठिकाणी अवैध व्यवसाय सुरु असून त्याबाबत पोलिस पाटील यांच्याकडून कुठल्याही प्रकारची माहिती दिली जात नसल्याचे पोलिसांच्या छाप्यातून समोर आले आहे. ज्या ठिकाणी अवैध व्यवसायावर पोलिस विभागाने छापे टाकून गुन्हे दाखल केले त्या ठिकाणच्या पोलिस पाटील यांच्यावर कारवाईची शिफारस पोलिस विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली जात आहे. दरम्यान, कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी येथे काही दिवसांपुर्वीच पोलिस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई केली होती. त्यानुसार पोलिस उपाधिक्षक एन. एस. देशमुख यांनी पोलिस पाटील पांडूरंग भुरके यांच्या विरुध्द अहवाल पाठवून कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. या शिवाय धानोरा जहाँंगिर येथील पोलिस पाटील विश्‍वनाथ जाधव, वाकोडी येथील पोलिस पाटील भागवत करडखेले यांच्या विरुध्दही कारवाई करण्याबाबत कळविण्यात आले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी धानोरे येथील पोलिस पाटील विश्‍वानाथ जाधव, वाकोडीचे पोलिस पाटील भागवत करडखेले, चिंचोर्डीचे पोलिस पाटील पांडुरंग भुरके यांना निलंबीत केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी ता. ३१ काढण्यात आले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *