Headlines

लाल संविधानाच्या नावाखाली काँग्रेसचा माओवाद!:देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल, प्रदेश कार्यकारिणी बैठकीनंतर घणाघाती भाषण




भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक पुण्यात पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पक्षाचे आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर ही रविंद्र चव्हाण यांची पहिलीच प्रदेश कार्यकारिणी बैठक असल्याने या बैठकीकडे पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर विशेष महत्त्वाने पाहिले गेले. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून विरोधकांवर सडकून हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर सातत्याने निवडणुका होत्या, त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात झालेल्या सर्व निवडणुकांत भाजप हाच मोठा पक्ष ठरला आणि महायुती ही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातली आहे, अशा पद्धतीने तीन चतुर्थांश जागांवर भाजप निवडून आली. अशा काळात कार्यकरणीची बैठक होऊ शकली नाही. आजचा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. एकीकडे संकष्टी चतुर्थी आहे आणि गणेश क्रीडा इथे आपली बैठक होत आहे. ज्या पुण्यात गणेशोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप दिले, त्याच पुण्यात ही कार्यकारिणी होत आहे, याचा अभिमान आहे. सांस्कृतिक उत्सव साजरा करण्याची क्षमता पुण्यातच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोक मला विचारणार की तुम्ही गणेशोत्सवाच्या संदर्भात बोललात, तर त्यात डीजे वाजला पाहिजे का? असा प्रश्न विचारणार. मी पुणेकरांना सांगू इच्छितो की पुण्यातच ही क्षमता आहे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनेच उत्सव साजरा केला जाऊ शकतो. त्यामुळे या वादात न पडता पुणेकरांनी दाखवून दिले पाहिजे की सांस्कृतिक पद्धतीने उत्सव कसा साजरा केला जाऊ शकतो. आक्रमण करणाऱ्यांची कार्यपद्धती समजून घेतली पाहिजे इंग्रजांनी या देशातल्या अनेक भटक्या विमुक्त जमातींना नेस्तनाबूत करण्यासाठी क्रिमिनल ट्राइब्स अशा पद्धतीने VJNT च्या अनेक जमातींवर कारवाई केली होती. आजच्याच दिवशी 1952 ला या देशात कायदा आला आणि इंग्रजांनी आपल्या भटक्या विमुक्तांना जो काही गुन्हेगारीचा शिक्का मारला होता तो आपल्या संविधानाने संपुष्टात आणला. आज मी त्यांना अभिवादन करतो. त्याचसोबत आज तिसरा श्रावण सोमवार आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला लढायला शिकवले आणि त्यांचे सैन्य जेव्हा मैदानात उतरायचे तेव्हा एकच घोषणा द्यायची, “हर हर महादेव.” आता त्याच प्रकारे लढाई करण्याची वेळ येणार आहे. हे आक्रमण नाही, आक्रमण करणारे पण नवीन नाही, पण त्यांनी कार्यपद्धती बदलली आहे. ते समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा शत्रूने वेगवेगळ्या पद्धतीने स्वराज्यावर हल्ले केले तेव्हा शिवरायांनी देखील अनेक पद्धतीने नावीन्य आणून त्या शत्रूचा नायनाट केला होता. जगात काही शक्तींना भारताला रोखायचेय देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले विरोधक, मी त्यांना शत्रू म्हणणार नाही. ते देखील नवीन कार्यपद्धतीचा अवलंब करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर गेली आहे. त्यांच्या नेतृत्वात 2030 पर्यंत आपल्या पेट्रोल-डिझेलची गरज शेतकरी बांधव भागवेल. भारत आत्मनिर्भरतेकडे जात आहे. हा भारत तुम्हाला आणि आम्हाला आवडत असेल. पण जगात अशा काही शक्ती आहेत, त्यांना आवडत नाही, पाहवत नाही. त्या शक्तींना माहीत आहे की या भारताला इथेच रोखले नाही, तर भविष्यात रोखता येणार नाही. जे विरोधक आहेत, त्यातल्या केवळ 5 टक्के लोकांना माहीत आहे की आपला वापर केला जात आहे. हे आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे. मूलभूत अधिकार संपवण्याचे काम कॉंग्रेसने केले देवेंद्र फडणवीस म्हणाले, नाव संविधानाचे घेऊन अराजकता निर्माण करण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. हे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे, याचा कोणी दुरुपयोग केला तर त्याचे हात जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेबांना सर्वात प्रिय असलेले मूलभूत अधिकार, हे मूलभूत अधिकार संपवण्याचे काम कॉंग्रेसने केले होते. आज ते लाल संविधान घेऊन फिरत आहेत, नाव संविधान आहे, पण त्याच्यामध्ये माओवाद आहे. छात्रों की गुंज नसून झुट की गुंज आहे. ते सांगतात भारत देश पितृसत्ताक आहे, इथे महिलांना जागा नाही. पण मला तुम्हाला सांगायचे आहे की ही जी पिढी आहे, मी त्यांना जेनझी म्हणत नाही, ती युवा शक्ती आहे. प्रियंका गांधी यांना संधी का दिली नाही? पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज खऱ्या अर्थाने मातृसत्ताकचे प्रतीक काय असेल तर ते वंदे मातरम् आहे. हे गीत सुरू झाले की सोनियाजींनी थयथयाट सुरू केला आणि ते गीत थांबवायला लावले. हे गीत गात गात अनेक स्वातंत्र्यसैनिक फासावर गेले. चित्रा वाघ यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता, की राहुल गांधी सांगा, या ठिकाणी खऱ्या अर्थाने महिलांना संधी देण्याची वेळ होती, तेव्हा प्रियंका गांधी यांना संधी का दिली नाही? एकीकडे महिलांच्या बद्दल बोलायचं आणि दुसरीकडे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार आहे, त्यावेळी कॉंग्रेसने कायदा आणून हा निर्णय रद्द करायला लावला होता. कॉंग्रेसचा डिलिमिटेशनला विरोध देवेंद्र फडणवीस म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण आणण्यासाठी कायदा आणला आणि आता हा कायदा लागू करायचा आहे. 2023 साली हे बिल, हा कायदा आला, यात काय होते, महिलांना 33 टक्के आरक्षण, डिलिमिटेशन होते. आता ते म्हणतात डिलिमिटेशन नका करू, आरक्षण देऊ शकता. यांचा हा दुटप्पीपणा आहे. 2026 साली पुन्हा बिल का आणावे लागले? कोरोनामुळे आपली जनगणना पुढे गेली होती, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *