![]()
विद्यमान सरकारकडे कोणतेही धोरण आणि नियोजन नसल्यामुळे सामान्य जनता महागाईच्या आगीत जळत आहे. मात्र, सत्ताधारी महागडी विमाने व गाड्यांतून प्रवास करीत असून दिवसेंदिवस महागाई वाढत असताना याबाबत कोणत्याही उपाययोजना हाती घेण्यात येत नाहीत. याबाबत रोष व्यक्त करीत काँग्रेस पक्षाच्या वतीने महागाईविरोधात कन्नड तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. माजी आमदार नामदेवराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी बोलताना माजी आमदार पवार म्हणाले की, खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मशागतीला डिझेल उपलब्ध करून द्यावे, पेट्रोल भाववाढ कमी करावी, २०२४ चे शेतकऱ्यांचे अनुदान व पीक विम्याचे पैसे त्वरित देण्यात यावे, शेतकऱ्यांना लागणाऱ्या रासायनिक खते, औषधी, बियाण्यांची भाववाढ झाली असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. नाफेडमार्फत कांदा खरेदी करावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला हमीभाव नाही, शेतीमाल आयात करू नये, २०२६ आत्ताच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. या निवेदनावर नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष सुमित्राताई आव्हाळे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुल जावेद सेठ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष याकूब शेख, दामोदर काळे, शंकर पवार, राजेंद्र शिंदे, धनंजय पिंपळे, प्रकाश बारगळ, शहराध्यक्ष असद पठाण, शेख वहाब शेख रहमान, मुक्तार खान, जब्बार खान, अहमद अली मोहम्मद अली, अब्दुल रुउफ, शेख असद अब्दुल रज्जाक, मगन जगन डोंगरे, दिलीप भोसले, भाऊसाहेब जाधव, नाना पवार, अप्पासाहेब साबळे, बाबासाहेब मुरकुंडे, रमेश बोडके, सोमनाथ दाभाडे, अर्चना दाभाडे, दिशांत जीवरंग,भाऊसाहेब जाधव, अर्जुन वाडकर, माजी नगरसेवक सुलतान भाईजी, धोंडीबा मनगटे, तेजराव थोरात, नारायण लगड, दिगंबर जाधव, विलास बोडखे इत्यादी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत. मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Source link
काँग्रेस पक्षाच्यावतीने महागाईविरोधात कन्नड येथील तहसीलसमोर आंदोलन:नायब तहसीलदारांना दिले विविध मागण्यांचे निवेदन