भारताच्या उपराजधानी नागपुरात ‘इंटरनॅशनल यूथ कॉन्फरन्स’ (IYC14)च्या प्रादेशिक आवृत्तीचे आयोजन उत्साहात पार पडले. आंतरराष्ट्रीय युवा संघटना अमेरिका आणि इंडिया पीस सेंटर, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संयुक्त राष्ट
.
‘युवा आणि जागतिक प्रशासनाचे भविष्य’ (Youth and the Future of Global Governance) ही या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. बदलत्या जागतिक परिस्थितीत तरुणांना केवळ भविष्यातील नेतृत्व म्हणून न पाहता, सध्याच्या निर्णयप्रक्रियेतही त्यांना सक्रिय सहभागी करून घेण्याची गरज असल्याचे या चर्चेत अधोरेखित करण्यात आले.
परिषदेत विविध राज्यातील युवा , आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी, सामाजिक कार्यकर्ते, समाजपरिवर्तक आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी प्रत्यक्ष तसेच हायब्रिड पद्धतीने सहभाग नोंदवला. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी जागतिक पातळीवरील विविध प्रश्नांवर आपले विचार मांडले.
जागतिक शांतता, धोरणनिर्मिती, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी युवकांची भूमिका कशी महत्त्वाची ठरू शकते, यावर परिषदेत विशेष भर देण्यात आला. हवामान बदल, सामाजिक असमानता, तंत्रज्ञानातील वेगवान बदल, रोजगार, शिक्षण, शांतता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांसारख्या विषयांवर युवकांच्या दृष्टिकोनाला जागतिक निर्णयप्रक्रियेत स्थान मिळणे आवश्यक असल्याचे मत चर्चेत व्यक्त करण्यात आले.
आजच्या काळात जगातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचा थेट परिणाम तरुण पिढीवर होत आहे. त्यामुळे या प्रश्नांवरील धोरणनिर्मितीत तरुणांचा आवाज ऐकला जाणे आणि त्यांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेणे आवश्यक आहे. युवकांकडे नव्या कल्पना, तंत्रज्ञानाची जाण आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता असल्याने जागतिक प्रशासन अधिक सर्वसमावेशक आणि प्रभावी बनवण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरू शकते, असा सूर परिषदेत उमटला.
या परिषदेमुळे नागपूरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील युवा संवादाचे विचारपीठ मिळाले. विविध देशांतील प्रतिनिधी आणि विचारवंतांना एकत्र आणून जागतिक प्रश्नांवर चर्चा करण्यासोबतच युवकांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य, शांतता आणि जबाबदार नेतृत्वाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
परिषदेच्या माध्यमातून युवकांनी जागतिक प्रश्नांकडे केवळ प्रेक्षक म्हणून न पाहता त्यावर भूमिका घेऊन सकारात्मक बदलासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले. जागतिक प्रशासनाच्या भविष्यात युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी अशा प्रकारच्या संवाद आणि विचारमंथनाच्या विचारपीठाची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित झाले.
नागपूरसारख्या शहरातून जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या विषयांवर युवकांचा आवाज बुलंद करण्याचा हा उपक्रम ठरला. परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी सहभागी प्रतिनिधी, मार्गदर्शक, वक्ते आणि सहकार्य करणाऱ्या विविध संस्थांचे आभार मानले. युवकांना जागतिक निर्णयप्रक्रियेच्या केंद्रस्थानी आणण्याच्या दिशेने ही परिषद महत्त्वपूर्ण पाऊल ठरल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा…
वाघहल्ल्याच्या पीडित कुटुंबासाठी रोहित पवार मैदानात:वर्ध्यात खासदाराचे 6 दिवसांपासून उपोषण, ‘1 कोटींची मदत द्या’

सेलू तालुक्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी भगवान चंद्रभान धुर्वे यांचा मृत्यू झाल्यानंतर सुरू असलेले आंदोलन सहाव्या दिवशीही कायम आहे. धुर्वे यांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत, कायमस्वरूपी रोजगार आणि गावाच्या पुनर्वसनासह विविध मागण्यांसाठी ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांवर ठोस निर्णय झाल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी भेट देत कुटुंबीय आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका करत “सरकारची चूक असेल तर कुटुंबाला 1 कोटी रुपयांची मदत द्यावी,” अशी मागणी केली. सविस्तर वाचा..