Headlines

Maharashtra pattern in Bengal; 58 MLAs claim to be ‘true Trinamool’, hand over letter to Speaker, resign as legislative group leader


  • Marathi News
  • National
  • Maharashtra Pattern In Bengal; 58 MLAs Claim To Be ‘true Trinamool’, Hand Over Letter To Speaker, Resign As Legislative Group Leader

कोलकाता4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पश्चिम बंगाल निवडणुकीतील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) उफाळलेले अंतर्गत बंड बुधवारी निर्णायक वळणावर पोहोचले. पक्षातून निलंबित आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली ५८ असंतुष्ट आमदारांनी एकत्र येत विधानसभा अध्यक्ष रथिंद्र बोस यांना लेखी पत्र दिले. यात त्यांनी ऋतब्रत यांना आपले विरोधी पक्षनेते आणि विधिमंडळ गटनेते मानले.

अध्यक्षांनी हा दावा स्वीकारला आहे. ऋतब्रत गटाने स्वतःला ‘खरे तृणमूल’ म्हणून घोषित केले असून अखरुज्जमान यांची आपला मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली. याला प्रत्युत्तर म्हणून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गटाने राज्यातील टीएमसीच्या सर्व संघटनात्मक समित्या बरखास्त केल्या. मात्र, असंतुष्ट गटाने थेट ममतांच्या सर्वोच्च स्थानाला आव्हान दिले नाही.

पत्रात त्यांना टीएमसी अध्यक्षा मानले गेले असून ‘मुख्य सल्लागार’ म्हणून नेतृत्व करण्याची मागणी करण्यात आली आहे. ऋतब्रत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा गट ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांचा अधिकार स्वीकारणार नाही. आणखी दोन आमदार आमच्यासोबत आहेत. दरम्यान, या घडामोडींवर उशिरापर्यंत ममता यांचे कोणतेही विधान आले नाही.

… १० वर्षांत देशातील चार मोठ्या राज्यांमध्ये पाच पक्षांत फूट : उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष: २०१६-१७ मध्ये ‘काका-पुतण्या’च्या लढाईत अखिलेश यादव यांनी पक्ष आणि ‘सायकल’ चिन्हावर पूर्ण नियंत्रण मिळवले. शिवपाल यादव पुन्हा सपामध्ये परतले आहेत.

बिहारमध्ये लोजप: २०२१ मध्ये रामविलास पासवान यांच्या निधनानंतर काका पशुपती पारस यांनी चिराग यांना हटवले. चिराग आज मोदी मंत्रिमंडळात मंत्री आहेत.

तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक: २०१७ मध्ये जयललिता यांच्यानंतर पलानीस्वामी कायदेशीर लढाई जिंकून पक्षाचे निर्विवाद प्रमुख बनले.

… १० वर्षांत देशातील चार मोठ्या राज्यांमध्ये पाच पक्षांत फूट

महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी : २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केले. निवडणूक आयोगाकडून ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ मिळवून ते तेव्हा मुख्यमंत्रीही बनले. पण आज ते उपमुख्यमंत्री आहेत, तर उद्धव ठाकरे विरोधात आहेत. याचप्रमाणे २०२३ मध्ये अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याविरोधात बंड केले. ते खरे ‘राष्ट्रवादी’ आणि ‘घड्याळ’ चिन्हासह उपमुख्यमंत्री राहिले. अजित पवार आता नाहीत. उर्वरित.स्पोर्ट््स

पुढे काय : ममतांना मिळणार नाही विरोधी पक्षाचा दर्जा; पक्षांतर बंदी कायदा लागू नाही

  • तृणमूलच्या ८० आमदारांपैकी ५८ जणांचा गट वेगळा झाला. ममतांकडे २२ आमदार उरलेत. कोणत्याही गटाला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किमान १० टक्के (२९४ पैकी ३० आमदार) गरजेचे आहेत.
  • असंतुष्ट गटाचे नेतृत्व ऋतब्रत करत आहेत. पक्षांतर बंदी कायद्याने अपात्रतेपासून वाचण्यासाठी वेगळ्या गटाला दोन तृतीयांश म्हणजेच ५४ आमदारांचा पाठिंबा हवा होता. असंतुष्टांकडे ५८ आमदार आहेत.

अभिषेक यांच्या घरी पोहोचली ईडी

ममता यांचे भाचे अभिषेक यांच्या अडचणी वाढत आहेत. बुधवारी ईडीचे एक पथक तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक यांच्या घरी पोहोचले. तपास यंत्रणा शिक्षक भरती घोटाळ्यात नोटीस बजावण्यासाठी पोहोचली होती. अभिषेक यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *