![]()
“ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथ आणि चोखोबा या संतांनी अभंग-ओव्यांच्या माध्यमातून जनसामान्यांचे विचार मांडले. तोच भारतीयत्वाच्या मूळ अस्मितेशी जुळणारा विचार पुढे नेण्याचे कार्य आज साहित्याच्या माध्यमातून करायचे आहे,” असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे नवनिर्वाचित कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी व्यक्त केले. इंडियन सोसायटी ऑफ ऑथर्स (नवी दिल्ली) व महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्यातर्फे महामंडळाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा येथील एन.पी.पी. लॉ कॉलेजमध्ये झाला, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, अशोक रोहमारे, राजेंद्रबापू जाधव, डॉ. ॲड. हिरालाल महानुभाव आदींची उपस्थिती होती. तरुणांना आता साहित्याकडे वळवणार: डॉ. महाळंक “आजचा ३०-३५ वयोगटातील तरुण मराठी साहित्यापासून काहीसा दुरावला आहे. त्यांना पुन्हा वाचनाकडे वळवणे आणि त्यांच्यात मराठी भाषेची गोडी निर्माण करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे. साहित्याची पालखी भविष्यात तरुणांच्याच खांद्यावर जाणार असल्याने, त्यांना परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाईल.’
Source link
संतांचे विचार साहित्याच्या माध्यमातून पुढे नेण्याचे कार्य करावे- प्रदीप निफाडकर