Headlines

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या:तातडीने बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे, अधिक्षक निलाभ रोहन यांचे आदेश




हिंगोली जिल्हा पोलिस दल बदल्यांनी ढवळून निघाले असून जिल्हयातील १५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी गुरुवारी ता. ४ काढले असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेश दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरवाड्यापासून पोलिस दलात बदल्यांची प्रक्रिया सुरु होती. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार करून समुपदेशनाने त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. कर्मचाऱ्यांना हव्या असलेल्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमधून समाधान व्यक्त होऊ लागले. जिल्हयातील १४० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच काढण्यात आले. विशेष म्हणजे ४० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या बदल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यानंतर आज या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप मोदे यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली. नव्याने हजर झालेले देविसिंह ठाकुर यांची हिंगोली शहर पोलिस ठाणे, आखाडा बाळापूरचे विष्णूकांत गुठ्ठे यांची हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे. तर हिंगोली ग्रामीणचे शामकुमार डोंगरे यांची औंढा नागनाथ पोलिस ठाणे, कळमनुरीचे प्रेमकुमार माकोडे यांची पोलिस निरीक्षक कक्ष, जिल्हा विशेष शाखेचे अमीर नाईक यांची कळमनुरी पोलिस ठाणे, वाहतूक शाखेचे निरीक्षक शरद मरे यांची आखाडा बाळापूर, पोलिस नियंत्रण कक्षातील शेख गफार शेख खलील यांची शहर वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे. या शिवाय कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे यांची वसमत ग्रामीण पोलिस ठाणे, नव्याने हजर झालेले महादेव पुरी यांची कुरुंदा पोलिस ठाणे, हट्टा पोलिस ठाण्याचे संग्राम जाधव यांची वसमत शहर पोलिस ठाणे, नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर यांची हट्टा पोलिस ठाणे, आयुब शेख यांची औंढा नागनाथ, उमाकांत पुणे यांची कळमनुरी तर वसंत आरसेवार यांची सायबर सेल व गुन्हे शाखेत बदली झाली आहे. कळमनुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत भिंगारे यांची गोरेगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *