Headlines

पैठणला 3 हजार चौरस फुटांचे विश्रामगृह अंतिम टप्प्यात:2 कोटी 40 लाखांचा खर्च; जायकवाडीचे पर्यटक, मंदिरात येणाऱ्या भाविक, शासकीय अधिकाऱ्यांची सोय‎



धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असलेल्या पैठण शहराला लवकरच अत्याधुनिक शासकीय विश्रामगृहाची नवी ओळख मिळणार आहे. संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या या ३ हजार चौ. फुटांच्या नव्य

.

संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी असलेल्या पैठणला वर्षभर राज्यभरातून हजारो भाविक व पर्यटक भेट देतात. जायकवाडी धरण (नाथसागर), संत ज्ञानेश्वर उद्यान, बाळासाहेब पाटील पुरातन वस्तू संग्रहालय तसेच विविध ऐतिहासिक स्थळांमुळे शहराचे पर्यटन महत्त्व मोठे आहे. याशिवाय शासकीय बैठका, व्हीआयपी दौरे आणि विविध कार्यक्रमांमुळे मंत्री, खासदार, आमदार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही शहरात सतत वर्दळ असते. मात्र, आधुनिक व दर्जेदार विश्रामगृहाच्या अभावामुळे येथे येणाऱ्या पाहुण्यांची मोठी अडचण होत होती. शहरातील पूर्वीचे शासकीय विश्रामगृह १०० वर्षांहून अधिक जुने झाल्याने ते अत्यंत जीर्ण अवस्थेत पोहोचले होते. सुरक्षिततेच्या कारणास्तव ती जुनी इमारत पाडण्यात आल्यानंतर नव्या विश्रामगृहाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

विश्रामगृहामध्ये अशा असतील आधुनिक सुविधा सुमारे ३ हजार चौरस फूट क्षेत्रफळावर उभारण्यात येणाऱ्या या प्रशस्त व दुमजली इमारतीत पाहुण्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. यात २ सर्वसोयींयुक्त सामान्य सूट, १ उच्च श्रेणीचा व्हीआयपी सूट, १ प्रशस्त सभागृह, स्वच्छतागृहे आणि स्वतंत्र वाहनतळ राहणार आहे. तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामासाठी २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून आता संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या निसर्गरम्य परिसरात हे विश्रामगृह आकारास आले असल्याचे सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *