Headlines

संख्याबळ नाही म्हणून उमेदवारांनी माघार घेतली:मग पैसे घेतल्याचा आरोप कसा करता? संजय शिरसाट यांचा मविआला सवाल




संजय राऊत काँग्रेस-राष्ट्रवादीने सहकार्य केले नाही सांगत आहेत, संख्याबळ नसल्याने पराभव होणार हे सांगत आहेत. तरीही उमेदवारांनी माघार घेतली तर त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप राऊत कसे करू शकतात, असा सवाल शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. संजय शिरसाट म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत संख्याबळ नाही त्यामुळे निवडणूक लढवण्यात काही अर्थ नाही हे उबाठाला काही उमेदवारांनी सांगितले पण त्यांनी ऐकलेउ नाही म्हणून उमेदवारांनी माघार घेतली, त्यानंतर उबाठाकडून त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहेत, यात काही तथ्य नाही हे जनतेला माहिती आहे. विधान परिषदेची चिंता करण्याची गरज नाही संजय शिरसाट म्हणाले की, नाशिकमध्ये प्रसाद हिरे हे आमच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवत आहे. आज उदय सामंत आणि गिरीश महाजन हे नाशिहकमध्ये आहेत ते चर्चा करतील. मला वाटते की महायुतीमधील कोणीही बंडखोरी करणार नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी चिंता करण्याची गरज नाही. सर्व 17 पैकी 17 जागांवर महायुतीचेच उमेदवार विजयी होणार आहेत. मविआची ताकद काय सर्वांना माहिती संजय शिरसाट म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत कोणी माघार घेतली म्हणून त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करायचा हे काही बरोबर नाही. निवडणूक लढवतांना कार्यकर्त्याना साथ द्यायची नाही, पण माघार घेतली तर त्याच्यावर आरोप करायचे हे चुकीचे आहे. आता कार्यकर्ता हुशार झाला आहे, तो घराची राख रांगोळी करत निवडणूक लढवणार नाही. तुम्ही त्याला पाठबळ सुद्धा दिले पाहिजे. विधान परिषद निवडणुकीत मविआची ताकद काय आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे या सर्व जागा महायुतीच जिंकणार आहे. म्हणून माघार घेतलेल्या उमेदवारांवर आरोप करण्याचे काम सुरू आहे, हे आरोप आता वाढत जातील. 25 कोटी काही छोटी रक्कम नाही संजय शिरसाट म्हणाले की, महायुती किती भक्कम आहे हे सर्वांना या विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसून येईल. 25 कोटी रुपये कोकण विधान परिषद निवडणुकीसाठी खर्च करण्यात आल्याचा आरोप राऊतांकडून करण्यात आला यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, 25 कोटी रुपये हा काय पॉकिट मनी आहे का? जर तुम्हाला हे सर्व माहिती आहे तर तुम्ही तिथे काय करत होतात? ही माहिती तुम्हाला कोणाला देता आली नाही का? तिथे काय वॉचमनगिरी करत होतात का? असा टोला शिरसाट यांनी राऊतांना लगावला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *