![]()
वैभव नाईक यांची चौकशी गेली अनेक वर्षे सुरू आहे. नेमके ही चौकशी का सुरू आहे? त्या चौकशीला काही दिशा नाही. वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की त्यांना नोटीस दिली जाते. आम्हालाही तशा नोटीस येत असतात, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले पाहिजे की केवळ विरोधकांनाच का नोटीस दिली जाते, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, देशभरात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या ही भाजपचीच मागणी आहे, तसे झाले पाहिजे. विधान परिषदेसारखी निवडणूक ओपन मतदानाने झाली पाहिजे. तर दुसरीकडे पक्षांतर बंदी कायद्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. विधानसभा अध्यक्ष हे राजकीय पक्षाचा चमचा असतो त्यांच्याकडे पक्षांतर बंदी संदर्भात काहीही अधिकार नसले पाहिजे कारण तो सुद्धा कोणत्या तरी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलेला असतो. तोच पक्ष त्यांना विधानसभेचा अध्यक्ष करतो. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला संजय राऊत म्हणाले की, पैसे देऊन जर माणसं फोडली जात नाही, घोडेबाजार केला जात नाही तर 50 खोके काय होते? इतके प्रेमाने 50 कोटी देणार असतील तर सर्वांना असे पैसे वाटले पाहिजे. केवळ सोबत येणाऱ्या आमदारांना का पैसे दिले जातात. गरीबांना पैसे दिले पाहिजे. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला हे खरे आहे. त्यासाठी 150 कोटी रुपये खर्च झाला आहे. हे पैसे आले कुठून हे फडणवीस, बावनकुळे आणि शिंदे गटाला सुद्धा माहिती आहे. 11 प्रमुख शहरांमध्ये मोठे आंदोलन संजय राऊत म्हणाले की, आज विद्यार्थ्यी आणि तरुणांना आंदोलन करावे लागत आहे कारण नीट पेपरफुटीचे केंद्र महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत. त्यांच्या राज्यामध्ये नीट पेपरफुटीचे केंद्र आहे, जे पकडले गेले ते सर्व जण भाजपशी निगडीत आहेत. त्यामुळे कॉकरोच पार्टीला समर्थन मिळाले नाही असे कोण म्हणाले देशभरातील 11 प्रमुख शहरांमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले, त्यांच्यावर अश्रूधुराचे फवारे सोडण्यात आले, हे आंदोलन काँग्रेस करत होते. म्हणून कॉकरोच जनता पार्टीला आंदोलनाला परवानगी दिली. सुर्यकांत यांच्यामुळेच जनता कॉकरोच पार्टी संजय राऊत म्हणाले की, भाजप समर्थक सरन्यायाधीश सुर्यकांत यांच्यामुळेच जनता कॉकरोच पार्टी सुरू झाली. त्यांनी बरोजगार तरुणांना झुरळ म्हटल्याने हे आंदोलन सुरू झाले. त्यांचा आणि इतर कोणत्याही पक्षाचा संबंध नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या मनात याबद्दल भीती आहे. काल यासंदर्भात मोठी आंदोलने देशभरात झाली आहे. याकडे सत्ताधाऱ्यांनी पहावे, कॉकरोचकडे नाही.
Source link
वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की नोटीस का येते?:विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाचा चमचा असतो!, संजय राऊत यांचा हल्लाबोल