![]()
भंडारदरा आणि कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य सध्या लखलखाटाने उजळून निघाले आहे. काजवा महोत्सवाच्या नावाखाली सुरू असलेला हा लखलखाट काजव्यांचा नाही, तर इको सेन्सिटिव्ह झोनचे नियम धाब्यावर बसवून तिथे सुरू असलेल्या मद्यधुंदांच्या पाहुणचाराचा आहे. विद्युत रोषणाई, वाहनांच्या दिव्यांचा झगमगाट, डीजेसह होणाऱ्या पार्ट्या यामुळे काजव्यांचा अधिवास धोक्यात आल्याचा ‘दिव्य मराठी’ने केलेला हा पर्दाफाश. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशांना केराची टोपली दाखवत, येथे रात्री 1 वाजेपर्यंत पर्यटकांचा मद्यधुंद धिंगाणा सुरू असतो. राष्ट्रीय हरित लवादाच्या स्पष्ट आदेशानुसार, रात्री 9 नंतर अभयारण्य परिसरात पर्यटकांना प्रवेशास सक्त मनाई आहे आणि रात्री 10 नंतर हे क्षेत्र पूर्णपणे बंद असणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना धाब्यावर बसवत येथे मध्यरात्रीपर्यंत पर्यटकांची जत्रा भरलेली असते. ऑनलाइन नोंदणी बंधनकारक असताना, याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे. प्रवेशद्वारावर कोणतीही तपासणी न करता प्रतिव्यक्ती 50 रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी 150 रुपये असा ‘प्रवेश कर’ सर्रास वसूल केला जात आहे. काय आहे नियम : हरित लवादाच्या नियमांची पायमल्ली काजवा महोत्सवासाठी पर्यटकांची ऑनलाइन पोर्टलवर बुकिंग अनिवार्य.
प्रत्यक्षात : नोंदणीच नाही प्रकारची ऑनलाइन बुकिंग केली जात नाही. रात्री 9 नंतर वाहनांना प्रवेशबंदी. रात्री 10 नंतर अभयारण्य क्षेत्र पूर्ण बंद.
प्रत्यक्षात : रात्री 1 पर्यंत पर्यटकांची या ठिकाणी ये-जा सुरूच होती. पर्यटकांच्या वास्तव्याच्या ठिकाणी मुक्तपणे मदिरापान केले जात, तर दुसऱ्या छायाचित्रात प्रवेश पावत्यांवरील नियम कागदावरच.
अभयारण्य क्षेत्रात मद्यपान धूम्रपान व मद्यपान करणे बंदी.
प्रत्यक्षात : ठिकठिकाणी टेंट लावून मद्यपान व धूम्रपान खुले चालू होते. आदेश केवळ कागदावर 1. काजवा संवर्धनासाठी गणेश बोऱ्हाडे यांची 2025 मध्ये याचिका.
2. 19 जानेवारी 2026 रोजी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे अंमलबजावणीसाठी बैठक.
3. प्रत्यक्षात पर्यटकांचा धांगडधिंगा, अंमलबजावणी वाऱ्यावर. तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन नोंदणी नाही काजवा महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांची नोंदणी व्हावी यासाठी आम्ही प्रक्रिया सुरू केली होती, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. रात्री 9 नंतर पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. – कृष्णा भवर, उप वनसंरक्षक आदेश धुडकावणाऱ्यांवर व्हावी कारवाई राष्ट्रीय हरित लवादाने काजवा पर्यटनासाठी स्पष्ट आणि कडक आदेश दिले आहेत. त्याचे पालन होत नाही. अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. – गणेश बोऱ्हाडे, याचिकाकर्ते
Source link
काजवा महोत्सवासाठी बुकिंग अनिवार्य, प्रत्यक्षात नोंदणीच नाही:निसर्गरम्य भंडारदरा परिसर बनला ‘पब’ आणि ‘पार्टी स्पॉट’