Headlines

पालघर रुग्णालय मारहाण प्रकरण:आमदार राजेंद्र गावित यांच्या मुलाला अटक; शिवसेना शिंदे गटाकडूनही निलंबनाची कारवाई




पालघरमधील रिलीफ रुग्णालयात दहीहंडीच्या दिवशी झालेल्या मारहाण प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित याला पालघर पोलिसांनी मिरा रोड येथील जीसीसी क्लबमधून ताब्यात घेऊन अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून रोहित गावित फरार होता, अखेर पोलिसांना त्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान पालघर येथील रिलीफ हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. रुग्णालयासारख्या ठिकाणी झालेल्या या भयंकर प्रकाराची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली होती. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील या हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध व्यक्त केला जात होता. पोलिसांकडून गुन्हे दाखल या मारहाणीप्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख राहुल घरत आणि आमदारपुत्र रोहित गावित यांच्यासह तब्बल 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित गावितसह 14 आरोपी फरार झाले होते. पालघर पोलिसांकडून या सर्वांचा कसून शोध सुरू होता. शिवसेनेकडून पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने तातडीने कठोर पावले उचलली. पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याने पक्षश्रेष्ठींनी मारहाण प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहर प्रमुख राहुल घरत आणि रोहित गावित यांच्यासह अन्य चार जणांचे पक्षातून तत्काळ निलंबन केले आहे. रमेश म्हात्रे प्रकरणाची पुनरावृत्ती दरम्यान, या घटनेच्या निमित्ताने नेत्यांच्या गुंडगिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. याआधी 6 जुलै रोजी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण-डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. त्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हात्रे यांना कडक शब्दांत फटकारले होते. म्हात्रे प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच पालघरमधील या घटनेमुळे पुन्हा एकदा संताप व्यक्त होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *