Headlines

154 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना किराणा साहित्य:दिवाळी फराळ वाटप, महसूल प्रशासनाने ग्रामीण विकास संस्थेसोबत एक हात मदतीचा उपक्रम



घरातील कर्त्या पुरुषाने मृत्यूला कवटाळल्यानंतर उघड्यावर पडलेल्या शेतकरी कुटुंबांची दिवाळी बहुतांश वेळा अंधारातच जाते. मात्र, संकटात सापडलेल्या या कुटुंबांना आपण एकटे नाही, तर समाज आणि प्रशासन आपल्या पाठीशी खंबीर उभे आहे, हा विश्वास देण्यासाठी महसूल प

.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम राबवण्यात आला. बुधवारी (४ नोव्हेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी अडकूने, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, एमजीव्हीएसचे अध्यक्ष मनसुख झांबड आणि सचिव अप्पासाहेब उगले यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अधिकाऱ्यांनी या कुटुंबांना एकत्र आणून त्यांच्याशी थेट संवाद साधला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संस्थेच्या संवेदनशील उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, घरातील कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबांना अनेक सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.” जनार्दन विधाते यांनीही विविध योजनांच्या माध्यमातून गरजूंच्या पाठीशी असून कुटुंबांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी प्रशासन तत्पर राहील, अशी ग्वाही दिली.

कृषी विभाग आणि दानशूरांचा मदतीचा हात

या उपक्रमात अग्रवाल युवा मंच आणि अनिरुद्ध जगताप यांनी दिवाळी फराळ उपलब्ध करून देत मोलाचे योगदान दिले. याशिवाय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांच्या विभागाच्या वतीने या गरजू कुटुंबांना रब्बी हंगामासाठी ज्वारीच्या बियाण्यांचे मोफत वाटप करण्यात आले. केवळ किराणा देणे हा या उपक्रमाचा उद्देश नसून, ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हा आधार देण्यात आला.

चारा टंचाई समस्या सोडवण्यासाठी ४५ गावांत प्रकल्प संस्थेचे सचिव अप्पासाहेब उगले यांनी एमजीव्हीएसच्या उपक्रमांची माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीत अल्पभूधारक शेतकऱ्यांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी हायड्रोपोनिक्स आणि अझोला उत्पादनाचे युनिट्स तब्बल ४५ गावांत स्थापन केले जाणार आहेत. तसेच, बेरोजगार ग्रामीण युवक-युवतींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण आणि रोजगार मेळावे आयोजित केले जातील. ऊसतोड कामगार, स्थलांतरित मजूर, जलसंधारण आणि महिला सक्षमीकरणावरही संस्था राज्यभर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *