Headlines

दौलताबादच्या घाटातील वणव्यात वनसंपदा खाक:ग्रामस्थांमुळे पाच तासांनंतर आग आटोक्यात




दौलताबाद घाट परिसरातील कालिकामाता मंदिराजवळील डोंगराला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. वाळलेले गवत आणि घाट परिसरात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. डोंगर परिसरात वेगाने पसरलेल्या या वणव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा जळून खाक झाली. हा परिसर माळीवाडा वनक्षेत्र, तसेच गायरान क्षेत्रात येतो. दुपारच्या वेळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आणि डोंगरावरील गवत व झाडेझुडपे वाळलेली असल्याने आगीने वेगाने पेट घेतला. वाऱ्याच्या दिशेने आग पसरत गेल्याने वनसंपदा भक्ष्यस्थानी पडली. माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाची गाडीही बोलावण्यात आली. वन विभागाचे वनरक्षक बी. एल. फंड, वनपाल मनोज उदार, वनमजूर प्रभाकर हजारे यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. ऑक्टोबर कोरडा गेल्याने घाटातील गवत वाळले ऑक्टोबर महिन्यात या वर्षी पाऊस पडला नाही. सप्टेंबर महिन्यातही पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे डोंगरावरील गवत वाळले आहे. झुडुपांना लागलेली आग वाळलेल्या गवतापर्यंत पोहोचली आणि डोंगरावर पसरली. उन्हाळ्यापूर्वीच घाटामध्ये वणवा भडकला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *