Headlines

ठाण्यात ड्रग्ज सिंडिकेट उद्ध्वस्त:3 कोटींचा चरससह ट्रामाडॉल जप्त, जम्मू-काश्मीरमधून दोन आरोपींना बेड्या




ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका आंतरराज्य ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. गुजरातच्या एका अट्टल तस्करासह थेट जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग आणि कुपवाडा येथून दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत ३ कोटी ३ लाख ५४ हजार ८१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, यात ३ किलो २० ग्रॅम चरस आणि तब्बल १२,९८४ ट्रामाडॉल कॅप्सुल्सचा समावेश आहे. अमली पदार्थविरोधी पथकाचे पोहवा अमोल देसाई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ मे रोजी रात्री ११.५० च्या सुमारास खारेगाव टोलनाक्यावर सापळा रचण्यात आला. तेथून मुंब्रा बाजूकडे जाणाऱ्या फिरोज अब्दुल खान (५२, रा. अंकलेश्वर, गुजरात) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ३ कोटी रुपयांचे चरस आणि ४ लाख ४८ हजार ५१४ रुपयांच्या प्रतिबंधित ‘स्पॅस्मो-प्रॉक्सिव्हॉन आर-प्लस’ (ट्रामाडॉल) कॅप्सुल्स मिळून आल्या. मोहम्मद अशरफ गुलाम अहमद शेदा, शौकत मीरला यांना काश्मीरमधून अटक केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *