Headlines

गोरेंचा वार, ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला‎:संधी मिळताच मोहितेंवर टीका, तीर्थक्षेत्र आघाडीच्या भालकेंना धक्का, 9 नगरसेवक गळाला‎


.

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिकेतील तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ११ पैकी ९ नगरसेवक भाजप सोबत असल्याचा दावा केला जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे व उमेदवार राजेंद्र राऊत यांनी भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत यांच्या निवासस्थानी तीर्थक्षेत्रच्या ९ नगरसेवकांसोबत बैठक घेतल्याने तीर्थक्षेत्रमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन मतभेद असल्याचे समोर आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राऊत यांच्या भेटीनंतर पंढरीतील राजकीय घडामोडींना वेग आला.

या वेळी राज्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, माजी आमदार राम सातपुते, भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष अनिल सावंत, आणि नागेश भोसले, श्याम गोगाव यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ९ नगरसेवक उपस्थित होते. या सर्व नेत्यांच्या आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांना निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केल्याचे सांगण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते दिलीप धोत्रे यांनीही यावेळी भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यासोबत असल्याचे जाहीर सांगितले. भैरवनाथ शुगरचे अध्यक्ष, शिवसेना नेते अनिल सावंत यांच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत, माजी आमदार राम सातपुते यांचे आदी नेत्यांचे पंढरपूर नगरीत स्वागत करण्यात आले आहे. प्रतिनिधी | सोलापूर खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पालकमंत्री गोरे यांचा ‘पोस्टमन’ म्हणत त्यांच्यावर टिका केली होती. यावर पालकमंत्री गोरे यांनी मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना मी उत्तर द्यावे’ असे बंधनकारक नाही. जनतेच्या कामासाठी पोस्टमन व्हायची वेळ आली तर मी होईल. माजी आमदार रणजीत मोहिते पाटील कुठे आहेत असे विचारले असता, पालकमंत्री गोरे म्हणाले मला माहित नाही ते पक्षाला माहित असे म्हणत उत्तर देणे टाळले. जनतेतून निवडून येत सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देऊन दिर्घाआयुष्य लाभण्यासाठी शहर भाजपच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांनी श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे आदी उपस्थित होते. सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री गोरे यांचा सत्कार केला. त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामाची पाहणी करत समाधान व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहण्याचा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडला. पंतप्रधान मोदींच्या यशस्वी १२ वर्षाच्या कार्यकाळानिमित्त भाजपच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान, या बैठकीला भाजपचे नेते, माजी आमदार प्रशांत परिचारक, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते भगीरथ भालके हे उपस्थित नव्हते. तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके यांचीही उपस्थिती नव्हती. त्यामुळे महायुतीच्या घटक पक्षातील मतभेद कायम असल्याचे समोर आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *