मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आंदोलनाचा इशारा दिला असताना अमृता फडणवीस यांनी त्यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आगमन झ
.
मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबरपासून मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे. नियोजित मार्गावर तीन मुक्काम केल्यानंतर 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याची त्यांची भूमिका आहे. या आंदोलनासाठी 5,000 लोकांना परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आंदोलनावरून सरकार आणि जरांगे यांच्यात पुन्हा संघर्षाची शक्यता निर्माण झाली असताना अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
जरांगे घरी आले तरी मी त्यांचं स्वागत करेन!
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणरायाच्या प्रतिष्ठापनेनंतर अमृता फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी मनोज जरांगे यांच्याशी वैयक्तिक पातळीवर सलोख्याचा सूर कायम ठेवला. “माझे भाऊ जरांगे घरी आले तरी मी त्यांचे स्वागतच करेन. बहीण म्हणून त्यांचे मी घरी स्वागत करेन,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय संघर्ष सुरू असताना अमृता फडणवीस यांनी जरांगे यांना ‘भाऊ’ म्हणून संबोधल्याने त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचे हे ताजे विधानही महत्त्वाचे मानले जात आहे.

15 सप्टेंबरपासून मुंबईकडे जरांगेंची वाटचाल
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी पुन्हा मुंबईकडे जाण्याची घोषणा केली आहे. 15 सप्टेंबरला आंदोलनाला सुरुवात करून 19 सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण करण्याचे नियोजन त्यांनी जाहीर केले आहे. या आंदोलनासाठी 5,000 समर्थकांसह आझाद मैदानात उपोषण करण्याची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी ही मागणी नाकारली. त्यानंतरही मुंबईला जाण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी मुंबईतील उपोषणासाठी परवानगी देण्यात आली होती. मग यावेळी परवानगी का नाकारण्यात आली, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. मराठा आरक्षणाची लढाई आता आपण एकट्याने लढत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात आंदोलनाचा मुद्दा
यंदा जरांगे यांच्या आंदोलनाची वेळ गणेशोत्सवाशी जुळत आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक, सार्वजनिक व्यवस्था आणि गणेशभक्तांना होणारी संभाव्य गैरसोय हा मुद्दा सरकारकडून उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन केल्याने गणेशभक्तांना असुविधा होणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जरांगे यांनी आंदोलनाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. दुसरीकडे, जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम असून मुंबईकडे जाण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत सरकार आणि मराठा आंदोलन यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
अमृता फडणवीसांचा शेतकऱ्यांसाठीही सरकारला संदेश
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना अमृता फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाचाही उल्लेख केला. राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. “शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे. सरकारने त्यांच्यासाठी मनात प्रेम ठेवून कार्य करावे,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी आणि राज्यातील नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, अशी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
डीजेचा आवाज नियमांनुसारच असावा
गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दाही यावेळी चर्चेत आहे. नागपूरमध्ये डीजे बंदीच्या मागणीसाठी हालचाली सुरू असून मोर्चे काढले जात आहेत. पुण्यासह महाराष्ट्रातील इतर भागांतही अशाच प्रकारच्या मागण्या होत आहेत. याबाबत अमृता फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीची मर्यादा आणि ध्वनिप्रदूषणासंदर्भात नियम निश्चित केले असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, गणेशोत्सव साजरा करताना या नियमांचे पालन केले तर उत्सवाचा आनंदही घेता येईल आणि परिसरातील नागरिकांना त्रासही होणार नाही. “सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीची तीव्रता किती असावी, याबाबत नियम स्पष्ट केले आहेत. त्यानुसार आपण वागलो तर आपली संस्कृतीही पुढे नेता येते आणि आजूबाजूच्या लोकांना त्रासही होत नाही,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
बाप्पांकडे स्वतःसाठीच नाही, महाराष्ट्रासाठीही मागा
गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील गणेशभक्तांना अमृता फडणवीस यांनी विशेष आवाहन केले. गणेश चतुर्थीपासून पुढील 10 दिवसांचा उत्सव आनंदाने साजरा करताना केवळ स्वतःसाठी प्रार्थना न करता महाराष्ट्र आणि देशातील नागरिकांसाठीही प्रार्थना करावी, असे त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, एक व्यक्ती पुढे गेल्याने संपूर्ण समाजाची प्रगती होत नाही. अनेकांना सोबत घेऊन पुढे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने इतरांना पुढे जाण्यासाठी मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जरांगे-सरकार संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वक्तव्य महत्त्वाचे
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकीकडे सरकारकडून कायदा, न्यायालयीन प्रक्रिया आणि गणेशोत्सवातील नागरिकांची गैरसोय यांचा मुद्दा मांडला जात आहे, तर दुसरीकडे जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी जरांगे यांच्याबाबत घेतलेला तुलनेने सौम्य आणि कौटुंबिक सूर चर्चेचा विषय ठरला आहे. “माझे भाऊ जरांगे घरी आले तर त्यांचे स्वागत करेन,” या त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय मतभेदांपलीकडे संवादाची शक्यता असल्याचा संदेश जातो का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. आता 15 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर आंदोलनाचे स्वरूप काय राहते, पोलिसांच्या परवानगीचा प्रश्न कसा सोडवला जातो आणि सरकारकडून पुढील पाऊल काय उचलले जाते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…
जवळजवळ सर्व मागण्या पूर्ण, गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन अयोग्य: देवेंद्र फडणवीसांचे मनोज जरांगेंना आंदोलनाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन

“मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने बहुतांश सर्व मागण्या पूर्ण केल्या आहेत. ज्या काही उर्वरित मागण्या आहेत, त्या सध्या न्यायालयाच्या विविध टप्प्यांवर असून संविधानाच्या चौकटीतच त्यावर निर्णय होऊ शकतो. अशा वेळी गणेशोत्सवाचे पर्व सुरू असताना मुंबईत आंदोलन करणे आणि गणेशभक्तांना असुविधा निर्माण करणे कोणासाठीही योग्य नाही. त्यामुळे या आंदोलनाचा निश्चितपणे पुनर्विचार व्हावा,” असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
जरांगेंच्या उपोषणाचा 17वा दिवस: सलाइन, पाणी-उपचार सोडले, आझाद मैदानासाठी पुन्हा अर्ज; आज दुपारी करणार मोठी घोषणा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण करण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या अर्जाला रविवारी पोलिसांनी परवानगी नाकारली. या नकारानंतर जरांगे पाटील यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांनी आपले आंदोलन आणखी तीव्र केले आहे. काल मध्यरात्रीपासून त्यांनी वैद्यकीय उपचार आणि पाणी घेणे पूर्णपणे बंद केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस असून, दुपारी ते माध्यमांशी संवाद साधून मोठी घोषणा करणार आहेत. त्यांच्या या घोषणेमुळे राज्य सरकारसमोरील पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी