Headlines

महिलांच्या अथर्वशीर्ष पठणामुळे पुण्यात उद्या वाहतूक बदल:दगडूशेठ हलवाई ट्रस्टतर्फे ऋषीपंचमीनिमित्त मध्य भागात कार्यक्रमाचे आयोजन




महिलांच्या अथर्वशीर्ष पठणानिमित्त मध्य भागात मंगळवारी (१५ सप्टेंबर) पहाटे वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. मंगळवारी पहाटे पाचनंतर अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम संपेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), लक्ष्मी रस्ता परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून ऋषीपंचमीनिमित्त मंगळवारी पहाटे अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात माेठ्या संख्येने महिला भाविक सहभागी होतात. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज रस्ता (जिजामाता चौक ते रामेश्वर चौक), अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), लक्ष्मी रस्ता परिसरातील विजय मारुती चौक ते बेलबाग चौक दरम्यानची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली. छत्रपती शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी गणेश रस्ता, फडके हौद चौक, देवजीबाबा मंदिर चौकातून उजवीकडे वळून महाराणा प्रतापसिंह रस्ता, हमजेखान चौक, गोविंद हलवाई चौकातून उजवीकडे वळून मंडईतील गोटीराम भैय्या चौकातून स्वारगेटकडे जावे. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहनचालकांनी अप्पा बळवंत चौकमार्गे बाजीराव रस्ता, फुटका बुरुज चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी रस्ता, जिजामाता चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. लक्ष्मी रस्त्यावरील विजय मारुती चौक ते सोन्या मारुती चौक दरम्यानची वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. वाहनचालकांनी सोन्या मारुती चौकातून बोहरी आळी, मिर्झा गालिब चौकमार्गे, नेहरू चौक, गोटीराम भैय्या चौकमार्गे इच्छितस्थळी जावे. हेही वाचा.. राज्यभरात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात आगमन:घराघरांत आणि मंडळामध्ये गणराय विराजमान, लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अलोट गर्दी देशभरासह महाराष्ट्रात आज लाडक्या गणरायाचे जल्लोषात आगमन होत असून, मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने मुंबईतील रस्ते दुमदुमले असून, लालबागचा राजा, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या प्रसिद्ध गणेश मंडळांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *