Headlines

मराठा आंदोलकांना छळण्याचे सरकारी षडयंत्र:वीज-पाणी तोडले तरी शोषितांचा आवाज दबणार नाही– काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट इशारा




“लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या आंदोलकांचा छळ करणे आणि मूलभूत सुविधा बंद पाडणे ही राज्य सरकारची जुनीच पद्धत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान वारंवार वीज पुरवठा खंडित करणे, साउंड सिस्टीम बंद पाडणे आणि आंदोलकांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय करणे ही या सरकारची मराठा आंदोलकांना छळण्याची ठरवून केलेली शृंखला आहे,” असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण: ‘शोषितांची आणि शोषकांची भाषा वेगळी’ मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेवर सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या टीकेला सपकाळ यांनी चोख प्रत्युत्तर दिले. “शोषितांची भाषा आणि शोषण करणाऱ्यांची भाषा कधीही एक असू शकत नाही. सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यात नेहमी लपवाछपवी असते. सरकारने आधी तीन वेळा मराठा समाजाला दिलेली आश्वासने जाहीर करावीत, मग इतरांच्या भाषेची समीक्षा करावी.” आंदोलन चिघळण्यामागे सरकारचा हात “जातीनिहाय जनगणनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा प्रश्न अगदी सहज सुटू शकतो. मात्र, विविध घटकांना न्याय देण्याची राज्य सरकारची राजकीय इच्छाशक्तीच संपली आहे. त्यामुळेच हे आंदोलन जाणीवपूर्वक चिघळवले जात आहे.” “आंदोलनाच्या ठिकाणी वीज घालवणे, माईक सिस्टीम बंद करणे अशा खोडसाळ कारवाया करून समर्थकांमध्ये गोंधळ उडवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. पण असल्या दडपशाहीने मराठा समाजाचा आवाज बंद होणार नाही.” राज्यात कोरडा दुष्काळ; 50 हजारांची मदत द्या सपकाळ म्हणाले, “लांबलेल्या पेरण्या आणि पावसाने दिलेल्या ओढीमुळे पिके करपून गेली आहेत. आता पाऊस आला तरी खरीप वाचू शकत नाही. सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजार रुपयांची सरसकट मदत द्यावी. तसेच कर्जाचे पुनर्गठन न करता संपूर्ण कर्जमाफीचा सुधारित शासन निर्णय काढून रब्बीसाठी मोफत खते, बियाणे उपलब्ध करून द्यावे.” MPSC पेपरफुटी; संपूर्ण प्रकरणाच्या तोंडाला काळे फासले गेले “MPSC परीक्षांमधील पेपरफुटी हे एक महाभयंकर रॅकेट आहे. मुख्यमंत्र्यांनी मर्जीतील अध्यक्ष आणि सचिव नेमून हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केला. सचिवांच्या तोंडाला प्रत्यक्ष शाई लावली की नाही, यापेक्षा संपूर्ण प्रकरणातून अध्यक्ष, सचिव आणि मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला काळे फासले गेले आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशी करून दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी.” अमित शहांचा मुंबई दौरा म्हणजे ‘मेवा संकल्प अभियान’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त सुरू होणाऱ्या सेवा अभियानावर टीका करताना ते म्हणाले, “हा सेवा संकल्प नसून महायुतीचा ‘मेवा संकल्प’ आहे. आर्थिक राजधानी मुंबईतून भाजपला किती लूट करता येईल आणि कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींमधील वाटप कसे करायचे, याचा हिशोब घेण्यासाठी अमित शहा आले आहेत. त्यांनी हिंमत असेल तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करावे.” गायकवाड विरुद्ध महाले वाद: ही भाजप-सेनेची ‘नुरा कुस्ती’ बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले यांच्यातील संघर्षावर भाष्य करताना, “हा वाद जनतेसाठी नसून कोणी किती भ्रष्टाचार करावा आणि कोणी किती दमदाटी करावी, यातून निर्माण झालेली नुरा कुस्ती आहे. एकमेकांच्या घराण्यावर चिखलफेक करणे जिल्ह्याच्या संस्कृतीला घातक आहे.” वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; 1 कोटींची मदत द्या वर्धा जिल्ह्यातील रायपूर येथे वाघाच्या हल्ल्यात मृत शेतकऱ्याचा मृतदेह अनेक तास पडून राहिल्याच्या घटनेवर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मानव-वन्यजीव संघर्ष विदर्भात गंभीर बनला असून, संबंधित शेतकरी कुटुंबाला 1 कोटी रुपयांची तातडीने मदत देऊन शासनाने ठोस धोरण राबवावे, अशी मागणी त्यांनी केली. हेही वाचा… 3300 कोटींचे मालक, तरी रस्त्यावर भिकारी बनून फिरला भाजपचा आमदार : घाटकोपरच्या रस्त्यावर पराग शहांनी घेतला अनुभव, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेमकं कारण समोर मुंबईतील घाटकोपर पूर्व मतदारसंघाचे भाजप आमदार पराग शहा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये कोट्यवधींची संपत्ती असलेले पराग शहा चक्क भिकाऱ्याच्या वेशात घाटकोपरच्या रस्त्यांवर फिरताना आणि नागरिकांकडून मदत स्वीकारताना दिसत आहेत. सुरुवातीला हा प्रकार पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, त्यामागील कारण समोर आल्यानंतर या घटनेची राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *